लंडन: ब्रिटनमध्ये(britain) एअर ट्रॅफिर कंट्रोल सिस्टीम (air traffic control system) फेल झाली आहे. यानंतर ब्रिटनने आपले एअर स्पेस बंद केले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे घडले आहे आणि याचा परिणाम सर्व आंतरराष्ट्रीय विमानांवर पडला आहे. ब्रिटनमधून उड्डाण करणाऱ्या विमानांवर स्थगिती घालण्यात आली आहे. सोबतच अलर्टही जारी केला आहे की आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स उशिराने सुरू आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या समस्येचा सामना करावा लागत आहे. यासाठी सुरक्षित उड्डाणांसाठी ही स्थगिती घालण्यात आली आहे. इंजीनियर तांत्रिक बिघाड शोधत आहेत आणि तो ठीक करत आहेत.
Britain’s National Air Traffic Service (NATS) was forced to restrict the flow of aircraft on Monday as it works to address a technical issue, it said, reports Reuters
“We are currently experiencing a technical issue and have applied traffic flow restrictions to maintain safety.…
— ANI (@ANI) August 28, 2023
तर नॅशनल एअऱ ट्रॅफिक सर्व्हिसेसने प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच आम्ही लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही सांगितले. दरम्यान, त्यांनी हे सांगितलेले नाही की काय प्रॉब्लेम झाला आहे आणि ठीक होण्यासाठी किती वेळ लागू शकतो.