
या सूर्य मोहिमेचे थेट प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथे उपस्थित राहून पाहता येणार, आजच नोंदणी करा...
श्रीहरीकोटा : इस्रोच्या सूर्य मोहिमेचे (Sun Mission) लाँचिंग २ सप्टेंबर रोजी श्रीहरिकोटा येथून होणार आहे. चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेच्या यशानंतर इस्रो आता मिशन आदित्य एल१ (Mission Aditya) लाँच करणार आहे. तिरुपती जिल्ह्यातील श्रीहरिकोटा (Shriharikota) येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल१ हे मिशन लाँच करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, आता या सूर्य मोहिमेचे थेट प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथे उपस्थित राहून पाहता येणार आहे.
यावेळी इस्रोकडून आदित्य एल१ मिशनचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी सामान्यजणांना आमंत्रित केले आहे. श्रीहरिकोटा येथील लाँच व्ह्यू गॅलरीमधून तुम्हाला सूर्य मोहिमेअंतर्गत होत असलेल्या आदित्य एल१ मिशनचे थेट लाँचिंग अनुभवता येणार आहे. इस्रोने सांगितल्याप्रमाणे, भारतीय वेळेनुसार सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा येथून हे मिशन लाँच केले जाईल.
🚀PSLV-C57/🛰️Aditya-L1 Mission:
The launch of Aditya-L1,
the first space-based Indian observatory to study the Sun ☀️, is scheduled for
🗓️September 2, 2023, at
🕛11:50 Hrs. IST from Sriharikota.
Citizens are invited to witness the launch from the Launch View Gallery at… pic.twitter.com/bjhM5mZNrx
— ISRO (@isro) August 28, 2023
या मिशनचे लाँचिंग थेट पाहण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवर नोंदणी (Resgistration) करावी लागेल. इस्रोने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरुन (ट्विटरवरुन) रजिस्ट्रेशनची लिंक (https://lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION/index.jsp) दिली आहे. २९ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून तुम्ही या लिंकवरुन तुमचे नाव रजिस्टर करू शकता.
सूर्य मोहिमेचे लाँचिंग थेट पाहण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनवेळी तुमचे ओळखपत्र अपलोड करावे लागेल. भारताचे नागरिकत्व असलेले कोणतेही सरकारमान्य ओळखपत्र तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अपलोड करू शकता. यासोबत तुमचा फोन नंबर आणि ईमेल-आयडी सबमिट केल्यानंतर तुम्हाला या सूर्य मोहिमेच्या थेट प्रक्षेपणाचा पास मिळेल.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मिशन आदित्यविषयी माहिती दिली आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटले आहे की, "ही भारताची पहिलीच सूर्य मोहीम आहे. या मोहिमेद्वारे भारत सूर्याचा अभ्यास करणार आहे. हे यान २ सप्टेंबरला लाँच करण्यात येणार आहे. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून आदित्य एल १ हे यान प्रक्षेपित करण्यात येणार आहे. पुढील पाच वर्ष या मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे."