
सीमेवरील सैनिकांसाठी १ हजार १११ राख्या रवाना
मुंबई : हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या भांडुप मधील शिवसेना प्रभाग क्रमांक १०९ व व ११० मधील बहिणींनी १ हजार १११ अधिक राख्या (Rakshabandhan) सीमेवर पाठविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपविभागप्रमुख प्रकाश माने, भूषण पालांडे यांनी पुढाकार घेतला.
ईशान्य मुंबई विभाग प्रमुख अशोक पाटील, महिला विभाग प्रमुख राजश्री मांदविलकर, उपविभागप्रमुख वर्षा मंडलिक, विधानसभा संघटक ज्योती खानविलकर, शाखाप्रमुख संदीप कुंभार, शाखाप्रमुख जेयरीश सिल्वा, यांच्या सहकार्याने १ हजार १११ राख्या एरजुंन्ट रेजिमेंट आर्मी कॅप लेह लडाख आसाम येथील सीमेवरील सैनिकांसाठी पत्रासह पाठवण्यात आल्या आहेत.
देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांशी रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. त्यामुळे सीमेवरील या हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणाऱ्या शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी बहिणींनी राख्या सीमेवर पाठविण्यासाठी जो पुढाकार घेतला ही बाब निश्चितच कौतुकास्पद कामगिरी असल्याचे प्रतिपादन पोस्ट मास्टर सौ. समिक्षा संजीव सावंत (नाटळ) यांनी केले.
यावेळी भारत माता की जय... वंदे मातरम्... जयहिंद... असा जयघोष करण्यात आला.
वर्षा मंडलिक म्हणाल्या, ‘सैनिक हो तुमच्यासाठी... हे गाणे ऐकताच आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. सैनिक देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची बाजी लावतात. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रेम व संवेदना प्रत्येक भारतीयाच्या मनात असायला हवी. देशवासीयांनी त्यांच्याबरोबर साजऱ्या केलेल्या अशा सणांमधून सैनिकांना बळ मिळणार आहे.’
विधानसभा संघटक ज्योती खानविलकर म्हणाल्या ‘सैनिकांप्रती सामाजिक कृतज्ञता व्यक्त करून देण्यासाठी आणि त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतोय, हे निश्चितच आम्हाला भूषणावह आहे.
यावेळी, बापूराव रावराणे, उपशाखाप्रमुख राकेश जैन, नेहा वराडकर उपस्थित होत्या. भांडुप मधील अनेक ज्येष्ठ शिवसैनिकांनी व नागरिकांनी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल उपविभाग प्रमुख प्रकाश माने, भूषण पालांडे यांची प्रशंसा केली जात आहे.