हळूहळू तिने बाजूच्या जावेच्या नावावर असलेल्या दुकानातही मसाल्याचे खलबत्ते सुरू केले. यासाठी तिने आपल्या मोठ्या जावेची परमिशन घेतली नाही. उलट दोन दुकानांच्या मधे असलेली भिंत तोडून तिने एकच गाळा बनवला. यावर न थांबता तिने दोन्ही गाळ्यांचे लाइट बिल स्वतःच्या नावावर करून घेतले.
नात्यांपेक्षा लोक प्रॉपर्टीला महत्त्व देऊ लागलेले आहेत व त्या प्रॉपर्टीमुळे आपले नातेसंबंध संपुष्टात आणत आहेत. एका रक्ताचे एकमेकांचे विरोधी होत आहेत. एवढंच नाही तर जानी दुश्मन झालेले आहेत. आपलं नातं, आपलं प्रेम, आपलं कुटुंब, आपली माणुसकी हे सर्व काही एका प्रॉपर्टीमध्ये लोक विसरून जातात. नात्याने आपल्या पडत्या काळात आपल्याला आधार दिला हे या प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी लोक विसरून जातात.
रमेश, आनंद आणि सुरेश असे सख्खे तीन भाऊ मुंबईमध्ये वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये कार्यरत होते. सख्खे भाऊ असल्यामुळे तिघांचेही एकमेकांवर प्रेम होते आणि पडत्या काळामध्ये हे तिघे एकमेकांचा आधार म्हणून उभे राहत होते. रमेश मोठा, आनंद दोन नंबर व सुरेश तीन नंबर भाऊ होता. रमेश याच्या पत्नीने व आनंद याने मिळून दोन दुकानाचे गाळे विकत घेतले होते. दोन्हीकडे आजूबाजूलाच त्यांना गाळे विकत मिळाले होते. रमेशच्या पत्नीच्या नावावर एक गाळा व आनंदच्या नावावर एक गाळा असे ते दोन गाळे होते. सगळी कागदपत्रे रमेशच्या पत्नीच्या नावावर व आनंदच्या नावावर करण्यात आलेली होती. रमेशच्या पत्नीने व आनंदने ते दोन्ही गाळे भाड्याने चालवायला दिलेले होते.
दरम्यान सर्वात लहान भाऊ सुरेश हा बँकेत नोकरीला होता आणि एक दिवस अचानक घरी आल्यावर तो वेड्यासारखं करू लागला होता. अनेक डॉक्टर उपचार केले तरीही तो त्यातून बरा होत नव्हता. डॉक्टरांनी “त्याच्या डोक्यावर कसला तरी परिणाम झालेला आहे, त्यामुळे तो असा वागत आहे” असे सांगितले व यापुढे त्याला औषधोपचार चालू ठेवण्यास सांगितले. त्याला दोन मुलं लहान होती व आता त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? हा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी रमेशची पत्नी व आनंदने सुरेशच्या पत्नीला त्यांचं स्वतःचं दुकान चालवायला दिलं.
वंदनाला तिथे भाजीचा धंदा कर असं सांगितलं. ज्यामुळे तुझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तू करू शकतेस. आनंद याने सुरेशच्या पत्नीला म्हणजेच वंदनाला भाजीसाठी गाळा दिला. त्याचे एकही रुपयाही भाडे आनंद घेत नव्हता. वंदनाचा भाजीचा व्यवसाय जोरात चालू होता. आपली भावजय दुकान चालवते आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते या गोष्टीतच आनंद समाधान मानत होता. आपल्या भावाची मुलं मोठी होतील, तेव्हा आपण ते दुकान घेऊ, असा त्याने विचार केला होता.
व्यवसायाचे ज्ञान तिला जमायला लागलं आणि तिने त्या दुकानात आनंदची परमिशन न घेता मसाले कुटायचे इलेक्ट्रिक खलबत्ते बसवले. आनंदला हे समजल्यावर त्याने वंदनाला याबाबत जाब विचारला. तेव्हा तिने सांगितलं की, “या धंद्यात पैसा आहे आणि दुकान तुमचंच आहे. त्यात माझी मुलं व्यवस्थित कमावती झाली की, मी तुम्हाला परत करेन.” हळूहळू तिने बाजूच्या जावेच्या नावावर असलेल्या दुकानातही मसाल्याचे खलबत्ते सुरू केले व तिच्या दुकानातही ते खलबत्ते लावले. यासाठी तिने आपल्या मोठ्या जावेची परमिशन घेतली नाही. उलट दोन दुकानांच्या मधे असलेली भिंत तोडून तिने एकच गाळा बनवला. यावर न थांबता तिने दोन्ही गाळ्यांचे लाइट बिल स्वतःच्या नावावर करून घेतले. ही गोष्ट मोठ्या जावेला समजल्यावर तिने दुकानात जाऊन याबद्दल जाब विचारला व पोलीस स्टेशनमध्ये गेली. एवढेच नाही, तर मोठी जाऊ आणि आनंद यांनी जाऊन महावितरण यांना एक कंप्लेंट अर्ज दिला व “आमच्या परमिशनशिवाय आमची लाइटवरची नावं काढून दुसऱ्याच्या नावावर कशी केली?” असा जबाब विचारला. त्यावेळी सरकारी अधिकारी घाबरले आणि त्यांनी परत ज्यांच्या नावावर लाइट बिल होते, त्यांच्या नावावर केली. दुकानांना शटर होती, त्या शटरला आनंद आणि त्याच्या मोठ्या वहिनीने टाळे लावले. तेही टाळे वंदना तोडायची आणि आपला धंदा सुरू करायची.
पोलिसांकडे तक्रार गेल्यावर ही वंदना सांगायची की, “माझ्या सासऱ्याचे गाळे आहेत आणि त्याच्यामुळे माझाही अधिकार त्यामध्ये आहे.” ज्यावेळी आनंद आणि त्याची वहिनी खरेदीखत दाखवायचे, त्यावेळी पोलिसांना विश्वास वाटला आणि तुमचा फॅमिली मॅटर आहे आपापसांत मिटवा, असा त्यांनी सल्ला दिला. आनंद आणि त्याची वहिनी दुकानात जाऊन बसले की, त्यांना शिवीगाळ कर, काय कर अशा पद्धतीने त्रास वंदना देऊ लागली आणि लोकांना खोटं सांगू लागली की, “मी धंदा करत होते हे म्हणून माझे गाळे आहेत या लोकांनी जबरदस्ती माझ्या गाळ्यांवर कब्जा केला आहे. नवऱ्याच्या वाईट परिस्थितीत मी माझ्या कुटुंबाला सांभाळते ते या दोघांना बघवत नाही” असं ती लोकांना सांगू लागली.
जमिनीत आतपर्यंत घातलेले खलबत्ते काढायचे कसे कारण ते काढण्यासाठी वीस हजारांपर्यंत खर्च येत होता आणि ते खलबत्ते काढायला वंदना काय तयार नव्हती. म्हणून योग्य कायदेशीर सल्ला घेऊन खलबत्ते इलेक्ट्रिकवर चालत होते म्हणून आनंदने व त्याच्या मोठ्या वहिनीने इलेक्ट्रिकल पाॅवरच बंद करायचे ठरवले व दिवसभर आपण दुकानातच थांबायचे असा निर्णय घेतला. जर इलेक्ट्रिकल सप्लायच बंद केली, तर ते खलबत्ते चालणार नव्हते आणि खलबत्तेच चालत नसतील, तर वंदना धंदा करणार कसा? कारण ते दुकान खरेदी केलेले खत कागदपत्र, लाइट बिल सगळे काही आनंद आणि आनंदच्या मोठ्या वहिनीच्या नावावर होते.
पडत्या काळामध्ये वंदनाला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आनंदने गाळा चालवायला दिला. एवढेच नाही तर त्या गाळ्याचे भाडेही त्याने घेतले नाही. भाजीच्या धंद्याकरिता आनंदचा आणि सोबत त्याच्या मोठ्या वहिनीचा गाळाही हडप केला. त्यांची परमिशन न घेता तिथे मसाल्याचे खलबत्ते लावले. वंदना त्या दुकानावरचा ताबा सोडायला तयार नव्हती कारण, त्या ठिकाणी आता टॉवर बनणार होते व त्या दुकानाचे मोठे गाळे आनंद आणि मोठ्या वहिनीला मिळणार होते. “आपण हे दुकान सांभाळले म्हणून ते दुकान आपले, तुमचे नाही” असं वंदना त्यांना सांगत होती. एवढंच नाही तर त्या दुकानात मलाही हिस्सा द्या, असे वर म्हणत होती.
ज्यांनी कष्टाने पै पै करून प्रॉपर्टी जमवली, आज त्यांनाच आपल्या हक्काच्या प्रॉपर्टीसाठी लढावं लागत आहे. मेहनत करतो कोण आणि आयतं जगायला बघतो कोण? अशी आजकाल मालमत्तेच्या बाबतीत विचारसरणी झालेली आहे. या मालमत्तेमुळे सख्खी भावंड पक्की वैरी झालेली आहेत.
(सत्य घटनेवर आधारित)
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…