Seema Deo : सीमा देव : आदर्श अभिनेत्री!


  • अभिनेत्री : अलका कुबल-आठल्ये


माझा आयुष्यातला पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘बापाची कमाल, पोरींची धमाल’. पहिल्याच चित्रपटात मला सीमाताईंसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यात निळूभाऊही होते. निळूभाऊ आणि सीमाताई ही जोडी आणि त्यांच्या पाच कन्या यांच्याभोवती चित्रपटाचं कथानक गुंफलं गेलं होतं. चित्रपटामध्ये मी त्यांच्या चौथ्या क्रमांकाच्या कन्येची भूमिका साकारली होती. त्यावेळी तर मी अगदीच नवखी होते. त्यानंतर मी ‘लेक चालली सासरला’ हा चित्रपट केला. सीमाताईंनी सेटवर कधीच नवखेपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्यावेळी सीमा देव हे चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव होतं. पण त्यांनी हा मोठेपणा कधीही मिरवला नाही. त्या सेटवर सगळ्यांशी अगदी प्रेमाने आणि मिळून मिसळून वागायच्या. माझ्यासारख्या नवख्या अभिनेत्रीला त्यांनी अगदी नीट सांभाळून घेतलं होतं. त्यांनी मला सर्वतोपरी मार्गदर्शन केलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं होतं. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरसारखा दुर्धर आजार जडला होता. पण त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांचा खूप छान सांभाळ केला. रमेशदादा असेपर्यंत त्यांना जोडीदार होता, सोबत होती. रमेश देव आणि सीमा देव ही चित्रपटसृष्टीतली सुपरहिट जोडी. या दोघांचं नाव एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. वर्षभरापूर्वी रमेशदादांचं निधन झालं आणि सीमाताईंचा सोबती त्यांना सोडून गेला. त्यामुळे त्यांना नक्कीच एकटेपणा जाणवत असावा.


एवढी मोठी अभिनेत्री असूनही सीमाताई खूप साधेपणाने वागत होत्या. आपणही तसंच वागायला हवं ही एक शिकवण त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला दिली. उपदेशाचे डोस पिऊन जी शिकवण मिळाली नसती ती सीमाताईंना बघून, त्यांचं निरिक्षण करून मिळाली. सीमाताई कधीही भेटल्या तरी छान आदराने, प्रेमाने बोलणार, आस्थेने चौकशी करणार, असा त्यांचा अगदी गोड स्वभाव होता. आता सीमाताईंचा तो गोड हसरा चेहरा प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही, याचं खरंच खूप
वाईट वाटतं.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

पितृसेवा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे एकदा महर्षी व्यासांना त्यांच्या सर्व शिष्यांनी प्रश्न केला की हे भगवान, या

‘ये जंग क्यों है?’

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे ताजमहाल’(१९६३) ही तशी प्रेमकथा, पण साहिर लुधियानवी नावाच्या चिंतनशील कवीने १९६३

मायेचं चैत्रगौर

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर भारतीय माणूस म्हणजे उत्सवप्रिय. सणांमध्ये...उत्सवांमध्ये रमणारा. आज आपल्या सणवार

मनभावन चैत्रगुढी

स्मृतीगंध; लता गुठे मुंबईसारख्या महानगरात सिमेंटच्या जंगलात राहताना कधी ऋतू बदलतो समजतही नाही; परंतु ग्रामीण

भारताची भविष्योन्मुख वाटचाल

विशेष; प्रा. सुखदेव बखळे गेल्या काही दशकांमध्ये देशातील वीजमागणी झपाट्याने वाढत आहे. पण जीवाश्म इंधनांवर

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,