
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आज आपल्या मन की बात (mann ki baat) या रेडिओ कार्यक्रमाच्या १०४व्या भागात बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया ट्विटरवरून याची माहिती दिली.सकाळी ११ वाजता ट्यून करा. संपूर्ण भारतातून प्रेरणादायी जीवन प्रवासांना उजाळा देणे ही नेहमीच आनंदाची बाब असते.
मन की बातचा १०३वा भाग ३० जुलैला प्रसारित झाला होता. त्या भागात पंतप्रधान मोदींनी मेरी माटी मेरा देश अभियानाची माहिती दिली होती. मन की बातच्या १०३व्या भागात बोलताना मोदींनी नैसर्गिक आपत्तीबद्दल सांगताना म्हटले की या संकटकाळात भारतातील सर्व देशवासियांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद दाखवली आहे. स्थानिक लोक, एनडीआरएफचे जवान आणि स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या लोकांनी दिवस-रात्र संघर्ष करून अशा संकटांचा सामना केला आहे.
Tune in at 11 AM tomorrow. Always a delight to highlight inspiring life journeys from across India. #MannKiBaat pic.twitter.com/XixbJHB3VE
— Narendra Modi (@narendramodi) August 26, 2023
आजच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक चांद्र मोहीम चांद्रयान ३च्या चंद्राच्या पृष्ठभागावरील यशस्वी लँडिंगबद्दल बोलणार आहेत. याआधी २३ ऑगस्टला चांद्रयान ३च्या लँडर मॉड्यूलने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे पाऊल ठेवले आहे.
मन की बात कार्यक्रम ३ ऑक्टोबर २०१४मध्ये सुरू झाला आहे ३० एप्रिल २०२३मध्ये या कार्यक्रमाने १०० भाग पूर्ण केले.