Thursday, July 4, 2024
Homeमहत्वाची बातमीजनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीत आलोय - अजित पवार

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महायुतीत आलोय – अजित पवार

बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांची आज बीडमध्ये (beed) जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. बीडकरांच्या प्रश्नांना मार्गी लावणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी सभेत बोलताना दिले.शरद पवार यांच्या १७ तारखेला झालेल्या सभेला उत्तर देण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती. यावेळी सरकारी योजनांबद्दलही त्यांनी जनतेला माहिती दिली.

संतांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय

बीडकरांनी आतापर्यंत अनेक चढउतार पाहिले आहेत. तसेच राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू नसतो. राजकीय मैत्री जपणारा असा हा बीडचा जिल्हा आहे. समाजकारण आणि राजकारणाची कशी सांगड घालता येते हे बीडकरांनी दाखवून दिलंय. मी येथे संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. त्यांनी दाखवलेला समतेचा मार्ग नक्कीच राज्याला दिशा देईल.

 

राज्यात जातीय सलोखा राहायला हवा

प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार येत असतात. मात्र त्यातून पुढे जात राहायचं असतं. मी महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मांमध्ये आपण एकत्र असल्याची भावना असली पाहिजे. येथेच राहून जनतेच्या कल्याणासाठी काम करायचे आहे. बीडमधील पीक विम्याचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त ठरतो. आता १ रूपयांत विमा काढता येणार आहे. यासाठी केंद्र तसेच राज्य सरकार पैसे भरणार आहे. केंद्राच्या योजनाही लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत.

आम्ही येथे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. ही पदे केवळ मिरवण्यासाठी नाही. बीडकरांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागपूरच्या येत्या काळातील अधिवेशनात सहा लाखांचे बजेट सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात बीडकरांचे प्रश्न मार्गी लावणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -