
बुडापेस्ट: हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३च्या (world athletics championship 2023) भालाफेक स्पर्धेत (javeline throw) भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. नीरज चोप्रानंतर डीपी मनू आणि किशोर जेना यांनीही फायनलमध्ये एंट्री घेतली आहे. डीपी मनू आणि किशोर जेना अनुक्रमे सहाव्या आणि स्थानावर राहत फायनलमध्ये आले.
पाकिस्तानचा अरशद नदीमही फायनलमध्ये
पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत ३७ स्पर्धकांपैकी १२ खेळाडूंनी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. नीरज चोप्राशिवाय पाकिस्तानचा अरशद नदीम आणि चेक रिपब्लिकचा जॅकब वाडलेच यांनीही क्वालिफाय केले आहे. नदीमने ८६.७९मीटरचा थ्रो केला. तर वाडलेचने ८३.५० अंतरावर भालाफेक केली.
One throw is all it takes 🎶
🇮🇳's Olympic champ @Neeraj_chopra1 is on fire in Budapest 🔥
Catch him in the javelin throw final on Sunday.#WorldAthleticsChamps pic.twitter.com/ACVakCvPIK
— World Athletics (@WorldAthletics) August 25, 2023
अशातच डीपी मनू आणि किशोर जेनासह ९ खेळाडूंनी टॉप १२मध्ये फिनिश करत फायनलमध्ये एंट्री घेतली. आता जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकासाठी या १२ स्पर्धकांमध्ये रविवारी स्पर्धा पाहायला मिळाले. यात तीन भारताचे तर एक पाकिस्तानचा खेळाडू आहे.
नीरज चोप्राबाबत बोलायचे झाल्यास त्याने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७मीटर दूर भाला फेकत अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. त्याची या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी त्याची कामगिरी ८८.६७ इतकी होती. नीरज चोप्राने यासोबतच पॅरिस ऑलिम्पिक २०२४साठीही क्वालिफाय केले आहे. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत खेळवली जाणार आहे.