Sunday, March 23, 2025
Homeक्रीडाMS Dhoni : ‘कोण खाणार आणि कोण डाएटवर : एमएस धोनी

MS Dhoni : ‘कोण खाणार आणि कोण डाएटवर : एमएस धोनी

रांची : भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा (MS Dhoni) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये माही आपल्या जिमच्या मित्रांची अग्निपरीक्षा घेताना दिसत आहे. धोनी सध्या रांचीमध्ये असून शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेत आहे. माहीने त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल २०२३मध्ये पाचव्यांदा चॅम्पियन बनवले.

मैदानावर खूप गंभीर राहणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी मस्ती करण्याची एकही संधी सोडत नाही. मैदानाबाहेर धोनी अनेकदा आपल्या एक ना वेगळ्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकून घेतो. दरम्यान, धोनीचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे. ज्यामध्ये माही आपल्या जिमच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या मित्रांसोबत जिममध्ये उभा आहे. यादरम्यान माही त्याच्या एका साथीदाराचा केक कापताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये केक कापल्यानंतर धोनी पहिल्यांदा त्याच्या जिम पार्टनरला केक खाऊ घालताना दिसत आहे. त्याच वेळी त्याचे सहकारी केक मागताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये माही म्हणते, ‘मला सांगा कोण खात आहे आणि कोण डाएटवर आहे.’

माही करतोय आराम अन् मौज मस्ती

सध्या माही गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर आराम करत आहे. अलीकडेच, एमएस धोनीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये माही एका आलिशान रोल्स रॉयस कारसह रांचीच्या रस्त्यावर फिरताना दिसला. कार चालवत असताना एका चाहत्याने धोनीला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि त्याचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -