मदुराई : तामिळनाडूच्या (Tamilnadu) मदुराईमध्ये पुनालूर-मदुराई एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला भीषण आग (Train Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.
रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे सव्वा पाच वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची घटना घडली.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.