Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडी‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ पुस्तकांचे प्रकाशन..

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ पुस्तकांचे प्रकाशन..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी भाषणांचा संग्रह

केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते आज शनिवारी भोपाळमध्ये कुशाभाऊ ठाकरे आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्रात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाच्या संग्रहाचा खंड एक आणि खंड दोन’चे प्रकाशन झाले.

पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या टप्प्यात, जून २०२० ते मे २०२१ या काळातील आणि जून २०२१ ते मे २०२२ या काळातील प्रेरणादायी भाषणे आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाने ही पुस्तके संकलित आणि संपादित केली आहेत.

यावेळी आपल्या भाषणात, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची भाषणे सातत्याने लोकांना प्रेरणा देणारी असतात. त्यांच्या प्रत्येक भाषणात, सर्वांना काही ना काही शिकण्यासारखे असते. त्यांचे प्रत्येकच भाषण मौल्यवान मार्गदर्शनपर आणि आशय संपन्न असल्याने, या भाषणांमधून काही भाषणे निवडणे, अत्यंत आव्हानात्मक होते, असेही ठाकूर म्हणाले.

या पुस्तकाच्या दुसऱ्या खंडात ८६ आणि तिसऱ्या खंडात ८० प्रेरणादायी भाषणे समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे, त्यांच्या भाषणातील महत्त्वाच्या विषयांनुसार संकलित करण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्टार्टअप इंडिया, सुशासन, महिला शक्ती, राष्ट्रशक्ती, आत्मनिर्भर भारत, जय जवान, जय किसान, जय विज्ञान या विषयांवरील पंतप्रधानांच्या भाषणांचा समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. तरुण आणि अभ्यासकांनी ही पुस्तके जरूर वाचावीत, असे आवाहन ठाकूर यांनी यावेळी केले. यात जाणून घेण्यासारखे आणि शिकण्यासारखे बरेच काही आहे. आपल्या भाषणात ते म्हणाले की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या विक्रम लँडरचे लँडिंग ही देशासाठी एक मोठी उपलब्धी आहे आणि ती जगात प्रथमच घडली आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -