जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २१.४१ सेकंदात शर्यत केली पूर्ण
बुडापेस्ट : जमैकाची धावपटू शेरीका जॅक्सनने (Sherika Jackson) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर शर्यतीत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकले. बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २१.४१ सेकंदात सुवर्णपदक जिंकले आणि आपले विजेतेपद कायम राखले.
फ्लोरेन्स ग्रिफिथनंतर २०० मीटरमध्ये शर्यत पूर्ण करणारी ती दुसरी सर्वात वेगवान धावपटू ठरली आहे. ग्रिफिथने १९८८ च्या ऑलिम्पिकमध्ये २१.३४ सेकंदांचा विक्रम केला होता. जॅक्सनने यापूर्वी १०० मीटरमध्ये दुसरे स्थान पटकावले होते.
२०० मीटरमध्ये जॅक्सनचा वैयक्तिक सर्वोत्तम २१.४५ सेकंद होता, जो तिने गेल्या वर्षी यूजीनमध्ये जिंकल्यानंतर सेट केला. त्यांच्याशिवाय गॅबी थॉमसने २१.८१ सेकंदांत रौप्यपदक तर शॉ कॅरी रिचर्डसनने २१.९२ सेकंदांसह कांस्यपदक जिंकले. याआधी सोमवारी त्याने १०० मीटर शर्यतीतही सुवर्णपदक पटकावले होते.