
देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आगामी प्रोजेक्टस
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा जपानमध्ये शासकीय अतिथी म्हणून सन्मान करण्यात आला. आजच ते आपल्या या दौऱ्यावरुन परतले आहेत. परतल्यानंतर मुंबई विमानतळावरच त्यांना पत्रकारांनी घेरलं. यावेळेस भारत- जपान संबंधांविषयी अनेक मुद्द्यांवर ते व्यक्त झाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जपान आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करतंय. मला जपानच्या सरकारने राज्य अतिथी म्हणून त्या ठिकाणी निमंत्रित केलं होतं. मोठ्या प्रमाणात विविध सरकारी अधिकारी मंत्री असतील, पंतप्रधानांचे सल्लागार असतील, अशा सर्व लोकांसोबत बैठका झाल्या. जायकासारख्या ओरिये एजन्सी सोबत त्याच ठिकाणी बैठक झाली. आणि महत्त्वाचं की मुंबईमध्ये जी आपल्याला वर्सोवा ते विरार एक ४२ किलोमीटरची सिलिंग तयार करायची आहे, ज्यामुळे आपल्या एम एम आर रीजन मधलं पूर्ण वेस्टर्न सबर्ब आणि पश्चिमेचा भाग हा सर्व ट्राफिक मुक्त होणार आहे, त्याला संपूर्ण सहकार्य देण्याकरिता त्यांनी सकारात्मकता दाखवली आहे आणि त्यांनीही विनंती केली आहे की आपल्या केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव आपण पाठवावा. त्याचप्रमाणे मुंबईतील मेट्रो लाईन ११, छत्रपती शिवाजी टर्मिनस टू वडाळा अंडरग्राउंड मेट्रो लाईन करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.
टोकियोमध्ये त्यांनी फ्लड मिटीगेशन प्रोजेक्ट राबवला आहे. त्यामध्ये साधारणपणे अंडरग्राउंड नेटवर्क तयार करून ज्यावेळी हाईटेड असतो आणि जोरात पाऊस असतो, पाणी फेकता येत नाही त्यावेळी पाणी खाली जमा करायचं असतं. त्यानंतर पाणी वापरायचं किंवा सोडायचं अशा प्रकारची व्यवस्था केलेली असते. हा प्रोजेक्ट आपण मुंबईकरता मागच्याच काळात त्यांच्याकडे दिला होता, आणि तो मंजूर करण्याकरता त्यांनी अनुकूलता दाखवली आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, यासोबत काही गव्हर्नरशी भेट झाली व ते देखील त्यांचे ट्रेड डेलिगेशन्स घेऊन इथे यायला तयार आहेत. त्या संदर्भात आमच्या तारखा वगैरे ठरत आहेत. अनेक मोठ्या कंपन्यांशी चर्चा झाली. सोनी कंपनीने देखील या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासंदर्भात अनुकूलता दाखवली. मोठ्या प्रमाणात उद्योग आपल्या येथे येण्याकरिता आग्रही आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आम्ही एक टीम तयार करत आहोत ज्यामध्ये उद्योग विभागाचे मेंबर तर असतील, पण जपानी भाषा बोलणारे देखील मेंबर असतील. सर्व प्रकारची गुंतवणूक आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल.
जपानच्या विविध व्यवसायिकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली, त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की, आम्ही सर्व इन्व्हेस्टमेंट ही चीनमध्ये केली पण आता आम्हाला ती इन्व्हेस्टमेंट चीनमध्ये सेफ वाटत नाही. त्यामुळे आता आम्हाला भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आम्हाला असं वाटतं की, भारतच असा देश आहे की ज्या ठिकाणी आमची इन्व्हेस्टमेंट सुरक्षित राहू शकते. आम्ही इतर देशांमध्येही गेलो पण ती क्षमता इतर देशांमध्ये नाही, असा विश्वास त्यांनी भारतावर दाखवला, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.