नवी दिल्ली : भारतात इंधनाचा वापर जगातील इतर देशांच्या तुलनेत तिप्पट आहे. आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन (Green hydrogen) हे भविष्यातील इंधन आहे, असे केंद्रीय मंत्री हरदीप पुरी (Hardeep Puri) म्हणाले.
एनडीटीव्ही कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री हरदीप पुरी म्हणाले की, “आज तुम्हाला इंधनाच्या वापरातून अर्थव्यवस्थेच्या विकासाची कल्पना येऊ शकते. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. आज नाही तर उद्या ग्रीन फ्युएल फॉसिल फ्युएलच्या किमतीत मिळेल. आणि हे लवकरच होईल.”
“भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकतो”
केंद्रीय मंत्री पुढे बोलताना म्हणाले की, भारतानं दहाव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपासून पाचव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा प्रवास केला आहे. भविष्यात भारत १० ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकेल याबद्दल कोणालाही शंका नाही. तसेच, पुरी यांनी बोलताना मॉर्गन स्टॅन्ले यांच्या वक्तव्याचा देखील दाखला दिला. ते म्हणाले की, मॉर्गन स्टॅन्ले यांचं म्हणणं आहे की, भारताचं भविष्य हे चीनच्या भूतकाळासारखं असेल.
ते म्हणाले की, “२०२१ मध्ये लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीन हायड्रोजनचा अवलंब करण्याबाबत सांगितलं तेव्हा अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात ज्यावेळी पंतप्रधान असं मोठं वक्तव्य करतात, त्यावेळी नक्कीच काहीतरी अर्थ असतो.