मुंबई: माजी क्रिकेटर युवराज सिंह (yuvraj singh) दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याची पत्नी हेझल कीचने (hazel keech) मुलीला जन्म दिला आहे. याची माहिती दिग्गज क्रिकेटर सोशल मीडियावर पोस्ट लिहून चाहत्यांना दिली आहे. युवराजने ट्वीट करत ही माहिती दिली. त्याच्या घरी कन्यारत्नाने जन्म घेतला आहे.
दुसऱ्यांदा बाबा बनला युवराज
युवराजने सोशल मीडियावर आपली पत्नी हेझल कीझसोबतचा फोटो शेअर केली आहे. या फोटोत ती आपल्या दोन मुलांसोबत दिसत आहे. युवराज सिंहने पोस्ट शेअर करताना लिहिले, स्लीपलेस लाईट तेव्हा चांगली वाटते जेव्हा छोटी राजकुमारी आभाने आमच्या कुटुंबाला पूर्णत्व दिले. याआधी युवराज सिंहच्या पत्नी जानेवारी २०२२मध्ये एका पुत्ररत्नाला जन्म दिला होता.
Sleepless nights have become a lot more joyful as we welcome our little princess Aura and complete our family ❤️ @hazelkeech pic.twitter.com/wHxsJuNujY
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) August 25, 2023
२०१६मध्ये युवराज आणि हेझल लग्नबंधनात अडकले होते. त्यानतर २०२२मध्ये हेझल आणि युवराज यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.