
काँग्रेसची मान शरमेने खाली...
वर्धा : विरोधकांच्या आघाडीतील (Opposition Parties) महत्त्वाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सत्ताधार्यांकडून कायमच टार्गेट केले जाते. आता निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसवर निशाणा साधण्यासाठी आणखी एक गोष्ट हाती लागली आहे. वर्धा (Vardha) या दारुबंदी (Prohibition of alcohol) असलेल्या जिल्ह्यात एक काँग्रेस नेता दारुविक्री करत असल्याचे उघडकीस आल्याने आता सत्ताधार्यांच्या हाती आयते कोलित मिळाले आहे. या घटनेची बरीच चर्चा होत आहे.
वर्धा जिल्हा मुळात 'गांधी जिल्हा' म्हणून ओळखला जातो. काँग्रेस नेते तोच निकष लावत वाटाघाटीत वर्धेची जागा मागून घेतात. त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर नीतिमत्ता पाळण्याची जबाबदारी काकणभर अधिकच. पण या प्रकरणात दारुबंदी असतानाही शहर काँग्रेस उपाध्यक्ष असलेल्या नेत्यानेच दारूचे दुकान थाटले. त्यामुळे काँग्रेसची मान खाली घालणारं हे कृत्य म्हणावं लागेल.
गजानन महादेव खंडाळे (Gajanan Khandale) असं या काँग्रेस नेत्याचं नाव आहे. सिंदी रेल्वे येथील त्यांच्या घरी दारू विकली जात असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी धाड टाकली. त्यात देशी विदेशी दारूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी त्याला अटक करीत माल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक वंदना सोनुने तसेच राजू सोनपित्रे, आनंद भस्मे, प्रशांत श्रीवास्तव, संदेश सोयाम, अमोल पिंपलकर, प्रदीप मस्के, उमेश खमणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांनी गुन्हा दाखल झाला असेल तर पक्ष कारवाई करेल, असं सांगितलं आहे.