Friday, May 9, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

चाकरमान्यांनो, आता विमानाने जा गावाला, मुंबई-सिंधुदुर्ग नियमित सेवा होणार सुरू

चाकरमान्यांनो, आता विमानाने जा गावाला, मुंबई-सिंधुदुर्ग नियमित सेवा होणार सुरू

मुंबई: गणपती(ganpati) म्हटला की कोकणी माणसाला गावाला जाण्याची ओढ लागते. कोकणातील (kokan) गणपतीची मजा ही काही न्यारीच असते. मात्र गणपतीला कोकणात जाण्यासाठीचा जो प्रवास असतो तो काही सोपा नसतो. गणपतीसाठी बुकिंग करणे म्हणजे ही कसोटीच असते.


गणपतीसाठी रेल्वे, बसचे बुकिंग आधीच हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांचा हिरमोड झालाय. तुम्हालाही बस किंवा रेल्वेचे तिकीट मिळालेले नाही आहे का तर मग टेन्शन कशाला घेता. आता चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमानसेवा नियमितपणे येत्याfliहे. ते सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी बोलताना त्यांनी माहिती दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग तसेच सिंधुदुर्ग ते मुंबई असा विमान प्रवास सुरू करण्यात आला होता. मात्र ही सेवा नियमित नव्हती. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या लोकांचा हिरमोड झाला होता. लोकांचा हाच मुद्दा लक्षात घेता पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटले होते. यावेळी त्यांनी या प्रश्नाबद्दल चर्चा केली. तसेच या अडचणीची संपूर्ण माहितीही दिली.


गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरळीत करण्यात यावी अशी मागणी रवींद्र चव्हाण यांनी केली होती. १९ सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. त्यांच्या या मागणीनुसार ही विमानसेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित होणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.


इतकंच नव्हे तर रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशीही याबाबत चर्चा केली होती.

Comments
Add Comment