मुंबई: कोणत्याही फिटनेसबाबत(fitness) जागरूक असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचाराल की दिवसाच्या शेवटच्या जेवणाची वेळ कधी असावी तर ती व्यक्ती रात्रीचे जेवण (dinner) लवकर करण्याच्या फायद्यांची मोठी यादी तुमच्यासमोर वाचून दाखवेल. २०२०मध्ये करण्यात आलेल्या अभ्यानुसार रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते आणि ब्लड शुगरचा स्तरही खराब होण्याचा धोका असतो.
रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदे
हेल्थ एक्सपर्टच्या मते रात्रीचे जेवण लवकर केल्याने वजन नियंत्रणात राहते मात्र केवळ जेवणाच्या वेळेच्या आधाराने वजन घटवता येते याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. मात्र रात्रीचे जेवण लवकर करण्याचे फायदेही आहेत.
पाचन तंदुरुस्त राहते – जर तुम्ही लवकर जेवत असाल तर तुमच्या जेवणाचे पचन व्यवस्थित होते. अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवणार नाही. तसेच शरीर डिटॉक्सही चांगल्या पद्धतीने होईल.
ब्लडशुगर कंट्रोलमध्ये राहतो – रात्रीच्या वेळेस जेवण लवकर केल्याने इन्सुलिनची प्रक्रिया योग्य राहते. रात्रीचे जेवण लवकर केल्याने शरीरात हाय ब्लड शुगरचा धोका कमी होतो. यामुळे ग्लायसेमिक नियंत्रणात मदत होते.
चांगली झोप येते – रात्रीच्या वेळेस जेवण लवकर जेवल्याने तुमचे शरीर रात्रीच्या वेळेस आरामाच्या स्थितीत येते यामुळे चांगली झोप येते.
हृदयाचे आरोग्य राहते चांगले – रात्रीचे जेवण लवकर केल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होते. याशिवाय रात्री लवकर जेवण केल्याने चयापचय क्रिया वाढते.