अटलांटा : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (former us president donald trump) आत्मसमर्पण करण्यासाठी गुरूवारी संध्याकाळी जॉर्जियामधील एका तुरूंगात पोहोचले. त्यांच्यांवर अवैध रितीने त्या राज्यात २०२०मध्ये निवडणुकीत खोडा घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. फुल्टन काऊंटी जेलमध्ये ऐतिहासिक रूपता पहिल्यांदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांचे मगशूट करण्यात आले. जेल रेकॉर्डनुसार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुकिंग प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यांना २ लाख डॉलरचा बाँड आणि इतर अटींवर सुटका करण्यात आली.
ट्रम्प यांच्या अटकेनंतर आणि गुरूवारी फुल्टन काऊंटी जेलमधून बाँडवर सुटका झाल्यानंतर ते पत्रकारांना म्हणाले, मी काहीच चुकीचे केले नाही.
ट्रम्प यांच्या आत्मसमर्पणानंतर शेरीफ ऑफिस म्हणाले, ट्र्म्प यांना औपचारिकपणे अटक करण्यात आली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले त्यांना फुल्टन काऊंटी जेलमध्ये ट्रम्प यांचा मग शॉट घेण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या चौथ्या अटकेनंतर फुल्टन काऊंटी जेलमध्ये एक मग शॉट जारी करण्यात आला.
ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष बनले आहेत ज्यांनी आपला मगशॉट घेतला आहे. हे फोटो जॉर्जियामध्ये सरेंडर केल्यानंतर घेतले होते. यात माजी राष्ट्राध्यक्षांनी निळे ब्लेझर आणि लाल टाय घातला आहे.
ट्रम्प जेलमध्ये पोहोचताच मोठ्या संख्येने समर्थक ट्रम्प यांचे बॅनर आणि अमेरिकेचा झेंडा फडकवत त्यांची एक झलक पाहण्यासाठी बाहेर उभे होते. बाहेर एकत्र झालेल्या समर्थकांमध्ये जॉर्जियामधील अमेरिकेचे प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीनही होते. हे माजी राष्ट्राध्यक्षांच्या भरवशाच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अटलांटा क्षेत्रातील विमानन उद्योगाशी संबंधिक ४९ वर्षीय लाईल रेवर्थ गुरूवारी सकाळपासूनच जेलकडे १० तासांपासून वाट पाहत होते.
काय आहे प्रकरण
२०२०मध्ये अमेरिकेतील निवडणूक निकाल बदलण्याच्या प्रयत्नांचा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष वकिलांनी ४५ पानांची चार्जशीट दाखल केली होती. यात ट्रम्प यांच्याविरोधात ४ आरोप लावले होते. अमेरिकेची फसवणूक करण्याचा कट रचणे, अधिकृत कारवाईमध्ये अडथळा घालण्याचा कट, कोणत्याही अधिकृत कारवाईमध्ये अडथळा आणणे आणि अडथळा आणण्याचा प्रयत्न, अधिकाऱ्यांविरोधात कट रचणे या चार आरोपांचा समावेश आहे.