Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीBharti Singh: लाखांवरून हजारांमध्ये पोहोचली भारती सिंहची कमाई, काय आहे कारण?

Bharti Singh: लाखांवरून हजारांमध्ये पोहोचली भारती सिंहची कमाई, काय आहे कारण?

मुंबई: लोकांना पोटधरून हसवणारी कॉमेडियन भारती सिंहने (bharti singh) नुकतीच आपली फी घटल्याबद्दलचा खुलासा केला आहे. कॉमेडियनने सांगितले की आधीच्या तुलनेत तिच्या फीमध्ये आता मोठ्या प्रमाणात कपात झाली आहे. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने कमी फी मिळण्याबाबतचे कारण सांगितले.

कोरोनाने झाला परिणाम

भारतीय सिंहने नुकतीच फीमध्ये झालेल्या कपातीबाबद हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले. भारतीने सांगितले, कोरोना काळात शोच्या बजेटवर खूप परिणाम झाला. असे प्रत्येक इंडस्ट्री आणि बिझनेसमध्ये झाले. मात्र कोणालाही हे वाटणार नाही की त्याच्या टॅलेंटला कमी फी मिळावी. आधी मी एका शोसाठी जितकी रक्कम घेत होती त्यापैकी २५ टक्केही रक्कम आता मला मिळत नाही.

अर्ध्या फीमध्ये काम नाही करणार

यासोबतच भारती म्हणाली, जर कोणी मला अर्धी रक्कम देत असेल तर मी काम करणार नाही. जर तुम्ही एखाद्या शोसाठी महिन्याचे २६ दिवस काम करायचे म्हणाल आणि रक्कम चांगली देत नसाल तर मी काम करणार नाही. मी माझ्या बाळाला १२-१२ तास एकट्याला सोडून येते. यासाठी मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा.

लाखोंवरून हजारोंवर आली कमाई

यासोबतच भारतीने म्हटले की मी असे नाही म्हणणार की मला आधी लाखो रूपये फी मिळत होती आणि मी आता ५० हजार घेत आहे. जेव्हा मी स्टेजवर येते तेव्हा मला लक्षातही नसते की मला या शोसाठी किती रूपये फी मिळते.

भारती सिंह अनेक रिअॅलिटी शो ऐवजी द कपिल शर्मा शोमध्येही दिसली आहे. या शोजव्यतिरिक्त ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -