नवी दिल्ली : पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंकेच्या (srilanka) धरतीवर येत्या ३० ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होत आहे. मात्र आशिया चषकावर आता कोरोनाचे संकट घोंघावू लागले आहेत. आशिया चषकाच्या सुरूवातीआधीच यजमान श्रीलंकेचा संघाला कोरोना व्हायरसची (corona virus) लागण झाली आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. श्रीलंकेचा खेळाडू अविष्का फर्नांडो आणि विकेटकीपर कुसला परेरा यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
श्रीलंकेच्यया संघाला आधीच मोठा झटका बसला आहे. श्रीलंकेचा स्टार ऑलराऊंडर हसरंगा आशिया चषकातून बाहेर जाणे हे निश्चित झाले आहे. नुकत्याच खेळवण्यात आलेल्या लंका प्रीमियर लीगदरम्यान हसरंगा दुखापतग्रस्त झाला होता. दरम्यान, दुखापतीव्यतिरिक्त हसरंगाने खेळणे सुरू ठेवले आणि कमालीचे प्रदर्शन केले.
हसरंगा या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याशिवाय सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. मात्र हसरंगाची दुखापत आता गंभीर झाली आहे. पुढील एक ते दोन दिवसांत तो स्पर्धेबाहेर गेल्याची माहिती मिळू शकते. श्रीलंकेला हे यजमानपद शेवटच्या क्षणी मिळाले आहे. या वर्षी आशिया चषकाच्या यजमानपदाचा अधिकार पाकिस्तानजवळ होता. मात्र भारताने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात संघ पाठवण्यात नकार दिला.
यानंतर या यजमानपदावरून वाद सुरू होता. त्यानंतर पाकिस्तानसोबत श्रीलंकेलाही यजमानपदाचे अधिकारही देण्यात आले. स्पर्धेतील पाच सामने पाकिस्तानात खेळवले जाणार. तर बाकी सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तानात एकही सामना खेळणार नाही. फायनलचा सामनाही श्रीलंकेत खेळवला जाणार आहे.