Monday, May 5, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीठाणे

मीरा रोडमध्ये पत्नीने केली पतीची निघृण हत्या

मीरा रोडमध्ये पत्नीने केली पतीची निघृण हत्या

भाईंदर: मीरा रोडच्या शांतीनगर भागात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीची खलबत्ताच्या दगडाने डोक्यात प्रहार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.

मीरा रोडच्या शांतीनगर सेक्टर ७ मधील ए -९ या आनंद सरिता सोसायटीत राहणारे आणि मुंबईच्या कपडा बाजार येथे काम करत असलेले रमेशकुमार गुप्ता त्यांची पत्नी राजकुमारी गुप्ता आणि त्यांचा मुलगा जतिन गुप्ता असे तीन जणांचे कुटुंब राहत होते. गुरुवारी संध्याकाळी राजकुमारी (५५) हिने आपले पती रमेशकुमार (६९) यांच्या डोक्यात घरातील खलबत्ताच्या दगडाने प्रहार करून खून केला. काही दिवसांपासुन राजकुमारी यांचे मानसिक संतुलन बिघडले होते अशी माहिती मिळाली आहे. खुनाची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त जयंत बजबळे, नयानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे घटनास्थळी पोहचले असुन पाहणी तसेच अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment