Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीWagner group : खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा!

Wagner group : खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा!

जी अवस्था वॅगनर ग्रुपची झाली, तीच विरोधकांची होणार!

विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजप आमदार नितेश राणे यांचा टोला

मुंबई : भाजपविरोधात (BJP) विरोधी पक्षांनी (Opposition Parties) एकत्र येत आघाडी स्थापन केली तेव्हा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही आघाडी म्हणजे ‘वॅगनर ग्रुप’ (Wagner group) असल्याचे म्हटले होते. मात्र कालच मिळालेल्या वृत्तानुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालं. याच गोष्टीचा आधार घेत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, असा टोला त्यांनी यावेळेस लगावला.

नितेश राणे म्हणाले, आपल्याला आठवत असेल वॅगनर ग्रुपबद्दल तेव्हा संजय राऊतने फार बोंबोबोंब केली, अग्रलेख लिहिला की भारतातला विरोधी पक्ष हा वॅगनर ग्रुप आहे. पण काल मिळालेल्या माहितीनुसार वॅगनर ग्रुपच्या प्रमुखांचं विमान क्रॅश झालेलं आहे, मग आता हे सगळे विरोधी पक्ष ज्या एका विमानात बसले आहेत त्यांचं विमान देखील २०२४ ला क्रॅश होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. कितीही बैठका घ्या आणि कितीही त्या ग्रुपला ‘I.N.D.I.A’ म्हणा, जी वॅगनर ग्रुपची अवस्था झाली आहे तीच या विरोधकांचीही होईल, हे मी विश्वासाने सांगू शकतो, असं नितेश राणे म्हणाले.

मुंबईत होणार्‍या बैठकींबद्दल हा ‘खिचडीचोर’ मोठ्या बाता करतो की पत्रकार परिषद होणार, मोठमोठे नेते येणार. मग त्या मुंबईच्या बैठकीत तू आणि तुझ्या मालकाच्या मुलाने कामगारांची जी खिचडी चोरलेली आहे ती विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना खायला घाला. तुम्हाला जमत नसेल तर आम्ही आमच्या वतीने या बैठकीसाठी खिचडीचे पॅकेट पाठवू. जेणेकरुन सगळे एकत्र बसा आणि खिचडी कशी चोरली यावर बैठकीत चर्चा करा आणि जे वॅगनर ग्रुपचं झालं तेच आपलं होणार यावर डोकं पकडून रडत बसा, अशा खोचक शब्दांत नितेश राणे यांनी टीका केली आहे.

संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांच्या योगदानाची जाण नाही

कोण आहेत हे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विचारणाऱ्या संजय राजाराम राऊत सारख्या खिचडी चोर, पत्रा चाळीतील मराठी लोकांची घरे लुटणारा चोर, कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार करणार्‍या संजय राऊतला चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाराष्ट्रासाठी, भाजपा साठी काय योगदान आहे याची ओळख असू शकत नाही, असंही नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -