मॉस्को: रशियामध्ये बुधवारी विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातात दहा लोक मृत्यूमुखी पडले आहेत. हा विमान अपघात मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग या दरम्यान झाला. या विमानात प्रवास करणाऱ्या प्रवासांच्या यादीत रशियाच्या वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिनही होते.
दरम्यान, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही की येवगेनी या विमानात प्रवास करत होते की नाही. काही मीडिया रिपोर्ट्सच्या बातमीनुसार हे विमान प्रिगोझिन यांचेहोते. रशियाची सरकारी न्यूज एजन्सी तासने आपात्कालीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या विमानात तीन पायलटसह एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
वॅग्नर एक खासगी लष्कर समूह आहे. वॅग्नर लष्कर रशियाच्या सैन्यासोबत मिळून युक्रेनविरोधात युद्ध लढत होते. गेल्या काही वर्षांपासून लष्कर आणि गुप्त मोहिमांवरून वाद होत आहे. वॅग्नर लष्कर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन हे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सगळ्यात खास होे. मात्र गेल्या काही महिन्यात प्रिगोझिन यांनी रशियन सैन्य आणि पुतीन यांच्याविरोधात बंड पुकारले होते.
पुतीन यांनी प्रिगोझिन यांचे हे पाऊल म्हणजे गद्दारी आणि पाठीत सुरा खुपसणारे आहे असे म्हटले होते. दरम्यान, प्रिगोझिन यांनी दावा केला होता की ते युक्रेनमध्ये युद्धाची कमान सांभाळणाऱ्या कमांडरना विरोध करत आहेत. असे करून प्रिगोझिन स्वत:ला देशभक्त म्हणवून घेत होते.