Monday, July 15, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023:आशिया चषकात रोहित, विराट करणार विक्रमी कामगिरी?

Asia Cup 2023:आशिया चषकात रोहित, विराट करणार विक्रमी कामगिरी?

जयसूर्याचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्याची संधी

आशिया चषकाच्या(Asia Cup 2023) इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याच्या नावे आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली हे या विक्रमाच्या जवळ असून आगामी आशिया चषक स्पर्धेत हा विक्रम मोडण्याची त्यांना संधी आहे.

आशिया चषकाच्या इतिहासात सनथ जयसूर्याने १२२० धावा केल्या असून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. या सर्व धावा फक्त आशिया कपमधील एकदिवसीय सामन्यात केल्या आहेत. भारताच्या विराट कोहलीने या स्पर्धेत १०४२ धावा जमवल्या आहेत. रोहित शर्माने स्पर्धेच्या इतिहासात १०१६ धावांचे योगदान दिले आहे. जयसूर्या आणि कोहली, रोहितच्या धावांमधील अंतर फारसे नाही. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेत या दोन्ही खेळाडूंना जयसूर्याचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

रोहित शर्माने एकदिवसीय आशिया कपमध्ये २२ सामन्यांच्या २१ डावांमध्ये ७४५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि ६ अर्धशतके आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने आतापर्यंत एकदिवसीय आशिया कपमध्ये ११ सामन्यांच्या १० डावात ६१३ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये कोहलीने १० सामन्यांच्या ९ डावांत ४२९ धावा केल्या आहेत. टी-२० आशिया कपमध्ये रोहितने ९ सामन्यांच्या ९ डावांत २७१ धावा केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -