Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीNitesh Rane : संजय राऊत हा काळ्या मांजरीसारखा नेहमी चांगल्याच्या आड येतो!

Nitesh Rane : संजय राऊत हा काळ्या मांजरीसारखा नेहमी चांगल्याच्या आड येतो!

नितेश राणे यांची सडकून टीका

मुंबई : सत्ताधाऱ्यांवर कायम टीका करणाऱ्या व सामना वृत्तपत्रातून (Samana Newspaper) आक्षेपार्ह विधाने करणाऱ्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा एकदा धारेवर धरलं. संजय राऊत हा काळ्या मांजरीसारखा नेहमी चांगल्याच्या आड येतो, अशी टीका यावेळी नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे म्हणाले, चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म असतो. पण सामनाचे कार्यकारी संपादक आणि उद्धव ठाकरेंचा कामगार संजय राजाराम राऊत हा काळ्या मांजरीसारखा नेहमीच चांगल्याच्या आड येतो. चांद्रयान-३ ही भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. जगभराने भारताचे, पंतप्रधान मोदींजींचे कौतुक केले. आमच्या वैज्ञानिकांचे कौतुक आहेच पण त्यांना प्रोत्साहन देणारे, ताकद देणारे त्यांचे मनोबल वाढवणारे पंतप्रधान मोदींजींचे पण तेवढेच श्रेय आहे. राजकीय इच्छाशक्ती काय असते हे आमच्या माननीय पंतप्रधानांनी दाखवलं आहे.

पुढे ते म्हणाले, तुझा मालक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री असताना हाफकीन इन्स्टिट्यूट कोरोना लस बनवणार अशी घोषणा केली गेली पण लस तयार झाली का? उलट हाफकीनच्या अधिकाऱ्यांना आणि कामगारांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं गेलं, त्यांच्यावर दबाव आणला गेला. तिथून काही पैसै निघतात का यासाठी मातोश्रीशी निगडित काही लोक तिथे फेऱ्या मारत होते. नवीन काही घडवायचे सोडा पण आपल्याच इन्स्टिट्यूटमध्ये जी दादागिरी आणि जे ब्लॅकमेल तुझ्या मालकाच्या माध्यमातून होत होते, त्याची माहिती अगर महाराष्ट्रासमोर दिली तर यांचे कपडे जागेवर राहणार नाहीत, अशी सडकून टीका नितेश राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -