Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

Mika singh: मिका सिंहची तब्येत बिघडली, कोट्यावधींचे नुकसान

Mika singh: मिका सिंहची तब्येत बिघडली, कोट्यावधींचे नुकसान

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मिका सिंह गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. तब्येत बिघडल्याने तो परदेशातच अडकला आहे. मीका सिंहने खुद्द सांगितले की त्याच्या घश्यामध्ये इन्फेक्शन झाले आहे आणि त्यामुळे तो कॉन्सर्ट करू शकला नाही. दरम्यान, यामुळे त्याला तब्बल १५ कोटींचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, त्यांनी यासाठी स्वत:च्या व्यस्त वेळापत्रकाला दोष दिला आहे. स्वत:च्या चुकीमुळे हे नुकसान भोगावे लागत असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने आपल्या शरीराला अजिबात आराम दिला नाही आणि त्यामुळे त्याची तब्येत आणि गळा खराब झाला.

प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे सांगितले. तो म्हणाला, माझ्या २४ वर्षांच्या करिअर कारकीर्दीत असे पहिल्यांदा घडले आहे. मला माझे शोज पुढे ढकलावे लागले कारण माझी तब्येत ठीक नाही आहे. जेव्हा माझ्या आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा मी नेहमी सतर्क असतो मात्र मी अमेरिकेत एकापोठपाठ एक सलग शोज केले. अजिबात आराम केला नाही. याचमुळे माझी तब्येत बिघडली.

मिका सिंहचे १५ कोटींचे नुकसान

तब्येत बिघडल्याने मिका सिंह अनेक शोज रद्द करावे लागले. सध्या मिका सिंह वर्ल्ड टूरवर आहे त्याचे वेगवेगळ्या देशात अनेक कॉन्सर्ट होणार होते. अशातच मिका सिंहने सांगितले की त्याला १०-१५ कोटींचे नुकसान झाले आहे. शोजमध्ये परफॉर्म न केल्याने त्याला लोकांचे पैसे परत करावे लागले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >