Monday, July 15, 2024
Homeक्रीडाWorld cup 2023: भारताची चांद्रमोहीम यशस्वी, आता भारत जिंकणार वर्ल्डकप?

World cup 2023: भारताची चांद्रमोहीम यशस्वी, आता भारत जिंकणार वर्ल्डकप?

मुंबई: भारताच्या चांद्रयान ३ (chandrayaan 3) या यानाने चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँडिंग करताच एक इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (south pole) उतरणारा भारत (india) हा पहिला देश ठरला आहे. चंद्रावर यशस्वीपणे यान पाठवणारा भारत चौथा देश ठरला आहे तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.

इस्त्रोच्या असंख्य कर्मचाऱ्यांनी गेल्या चार वर्षापासून घेतलेली मेहनत अखेरीस यशस्वी ठरली. इस्त्रोच्या या यशाचे सेलिब्रेशन भारतीय संघानेही आयर्लंडमध्ये साजरे केले. बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला यात भारतीय संघ चांद्रयान ३चे यश साजरे करताना दिसत आहे.

या चांद्रयान ३च्या यशानंतर एक सुखद योगायोग दिसत आहे. हा संयोग वर्ल्डकपशी संबंधित आहे. चांद्रयान २ ही मोहीम इस्रोने २०१९मध्ये लाँच केली होती. मात्र ती यशस्वी झाली नाही. तेव्हा भारतीय संघही वर्ल्डकपमध्ये सेमीफायनलमध्ये हरला होता.

 

आता चार वर्षानंतर इस्त्रोला चंद्रावर यशस्वी लँडिंग करता आली आहे. अशातच भारताच्याही वर्ल्डकप जिंकण्याच्या आशा उंचावल्या आहेत. मुंबई इंडियन्सने याबाबतचे ट्विट केले आहे. हे ट्विट व्हायरल होत आहे.

यावेळेस वनडे वर्ल्डकप भारतात खेळवला जात आहे. ही स्पर्धा ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत दोन वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. १९८३मध्ये आणि २०११मध्ये. २०११मध्ये भारतीय संघाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा भारतातच हा वर्ल्डकप रंगला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -