Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीSharad Pawar Photos : 'माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन', इशार्‍यानंतर अजित...

Sharad Pawar Photos : ‘माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन’, इशार्‍यानंतर अजित पवार गटाच्या बॅनर्सवरील शरद पवारांचे फोटो गायब!

छगन भुजबळांनी लगावला टोला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) बाहेर पडत अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप सरकारसोबत हातमिळवणी केली. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले असतानाही आम्ही एकच पक्ष आहोत, असे वारंवार अजित पवारांच्या गटाकडून सांगण्यात आले. या फुटीनंतर अजित पवार गटाने शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेऊन एकत्र येऊन काम करु, अशी गळही घातली. जे बॅनर्स अजित पवारांच्या गटाने लावले त्यावरदेखील शरद पवारांचा फोटो वापरण्यात आला. अजित पवार गटाकडून कोणतीही फूट किंवा मतभेद नसून शरद पवार कायम आमच्यासाठी आदर्श राहतील, हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी शरद पवार मात्र ही गोष्ट जुमानत नाहीत.

फुटीच्या घटनेला दीड महिना उलटल्यानंतरही अजित पवार गटाकडून बॅनर्सवर शरद पवारांचा फोटो वापरण्यात येत होता. आता मात्र हा फोटो न वापरण्यासंदर्भात अजितदादा गटाच्या वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्याचे समजत आहे. याचे कारण म्हणजे ‘फोटो वापराल तर कोर्टात खेचेन’ असा इशाराच शरद पवार यांनी अजित पवार गटाला दिला आहे. त्यामुळे अजित पवार गट सतर्क झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांचा फोटो फ्लेक्सवर किंवा इतरत्र कोठे न वापरण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.

छगन भुजबळांचा शरद पवारांना टोला

शरद पवारांनी फोटो वापरल्यास कोर्टात जाण्याची ताकीद दिल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांना टोला लगावला होता. आतापर्यंत फोटोचा अवमान झाला किंवा अनादर झाला म्हणून कोर्टात गेल्याच्या घटना पाहिल्या होत्या. परंतु आदराने आपला फोटो लावला म्हणून कुणी कोर्टात गेले, असे उदाहरण मी पाहिलेले नाही असा टोला मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांना लगावला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -