
नवी दिल्ली : ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा (69th National Film Awards) गुरूवारी करण्यात आली. अभिनेत्री आलिया भट्टला (alia bhatt) गंगुबाई काठियावाडीसाठी तर कृती सॅनॉनला (kriti sanon) मिमी सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे. तर पुष्पा सिनेमासाठी अल्लू अर्जुनला (allu arjun) सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार घोषित झाला आहे.
सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार सरदार उधम सिंहला देण्यात आला आहे तर एकदा काय झालं या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. छैलो शोने सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमाचा पुरस्कार पटकावला आहे. ७७७ चार्लीला सर्वोत्कृष्ट कन्नड सिनेमाचा पुरस्कार मिळाला आहे.
शेरशाहनेही जिंकला अवॉर्ड
शेरशाह या सिनेमाला स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला आहे. द काश्मीर फाईल्सला नर्गिस दत्त अवॉर्ड आणि बेस्ट कोरिओग्राफीची अवॉर्ड RRRला मिळाला आहे.
राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले सिनेमे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (गंगुबाई काठियावाडी), कृती सॅनॉन (मिमी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अल्लू अर्जुन (पुष्पा द राइज)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - निखिल महाजन (गोदावरी - द होली वॉटर)
सर्वोत्कृष्ट एडिटिंग - गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट अॅक्शन डायरेक्टर पुरस्कार - RRR (स्टंट कोरिओग्राफर - किंग सॉलोमन)
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन - RRR (कोरिओग्राफर- प्रेम रक्षित)
सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स - आरआरआर (स्पेशल इफेक्ट्स क्रिएटर - व्ही श्रीनिवास मोहन)
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी- सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पल्लवी जोशी (द काश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - पंकज त्रिपाठी (मिमी)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - भाविन रबारी
सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म - रॉकेट्री: द नंबी इफेक्ट
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन - पुष्पा / आरआरआर
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट - गंगुबाई काठियावाडी
सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझायनर - सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझायनर - सरदार उधम सिंग
विशेष ज्युरी पुरस्कार - शेरशाह
राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार - द काश्मीर फाइल्स
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - सरदार उधम सिंह
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट - छेल्लो शो
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट - 777 चार्ली
सर्वोत्कृष्ट मैथिली चित्रपट - समांतर
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - एकदा काय झालं
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट - होम
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट - Kadaisi Vivasayi