Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाHeath Streak : मी जिवंत आहे!

Heath Streak : मी जिवंत आहे!

झिम्बाब्वेचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची बातमी खोटी

झिम्बाब्वे : झिम्बाब्वे संघाचा माजी कर्णधार हीथ स्ट्रीक (Heath Streak) यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले, अशा बातम्या सकाळी आल्या होत्या. अशी माहिती खुद्द त्याचा माजी सहकारी हेन्री ओलांगा यांनी दिली होती. यानंतर त्या बातमीने क्रीडा विश्वात खळबळ उडाली.

सर्वांनाच धक्का बसला आणि त्यामुळेच भारतातील अनेक माजी क्रिकेटपटू आणि सध्याच्या क्रिकेटपटूंनी देखिल त्यांना श्रद्धांजली वाहिली. पण खरं तर स्ट्रीक जिवंत आहे. हीथच्या मृत्यूची बातमी खुद्द हेन्री ओलांगा यांनी खोटी ठरवली आहे आणि त्यांची जुनी पोस्टही डिलीट केली.

हेन्री ओलांगा यांनी सोशल मीडियावर एका नवीन पोस्टमध्ये लिहिले की, मी पुष्टी करत आहे की हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. मी नुकतेच त्याच्याकडून ऐकले. तिसऱ्या पंचाने त्याला परत बोलावले आहे आणि तो जिवंत आहे मित्रांनो… असे ट्विट हेन्री ओलांगा यांनी केले आहे.

हीथने नोव्हेंबर १९९३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यांचा पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा एकदिवसीय सामना होता. यानंतर हीथने डिसेंबर १९९३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.

त्याने शेवटची वनडे ऑगस्ट २००५ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आणि शेवटची कसोटी सप्टेंबर २००५ मध्ये भारताविरुद्ध खेळली. हीथने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरला तीन वेळा आणि सौरव गांगुलीला चार वेळा बाद केले. आपल्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात, हीथने भारताविरुद्धच्या हरारे कसोटीच्या पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -