 
                            नाशिक : चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली. क्षत्रिय समाज फाउंडेशन नाशिकचे तेजपाल सिंह सोढा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह हनुमान मंदिरात पंडित मिश्रा यांच्या हस्ते पूजन करत चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वीतेसाठी प्रार्थना केली.
चांद्रयान-३ आपल्या देशाच्या संशोधन क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असून सर्व भारतीयांच्या याकडे नजर लागून आहे. ही योजना यशस्वी होऊन भारत जागतिक पातळीवर आपला वेगळा ठसा उमटविणार आहे. त्यासाठी क्षत्रिय समाज फाउंडेशनच्या वतीने हनुमान मंदिरात पूजा करत प्रार्थना करण्यात आली अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तेजपाल सिंह सोढा यांनी दिली.

 
     
    




