Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीCM Eknath shinde: 'चांद्रयान ३' मोहिमेला यश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ही...

CM Eknath shinde: ‘चांद्रयान ३’ मोहिमेला यश, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ही प्रतिक्रिया

मुंबई: इस्त्रोची(isro) महत्त्वाकांक्षी मोहीम चांद्रयान ३(chandryaan 3) चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे लँड झाले आहे. संपूर्ण देशभरात एकच जल्लोष आहे. जगभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक केले जात आहे. भारताच्या चांद्रयान ३ने चंद्रावर पाऊल ठेवताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या प्रमुखांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चांद्रयान ३ हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ते ट्विटरवर म्हणाले,

बुद्धिवंतांचा देश अशी ओळख असलेल्या आपल्या भारताने आज हे देदिप्यमान, ऐतिहासिक यश मिळवलं आहे…

‘चंद्रयान ३’ मोहिमेमधील विक्रम लॅन्डर चंद्रावर उतरले आणि या मोहिमेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला…

या यशाने सर्व भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. देशातील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांचं हे यश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दिशादर्शक नेतृत्वाचं आणि पाठिंब्याचं बळ शास्त्रज्ञांच्या पाठीशी आहे.
श्रीहरीकोटा येथून १४ जुलैला ‘चंद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. अनेक अवघड टप्पे त्याने यशस्वीपणे पार केले.
‘चंद्रयान ३’ कडून वेळोवेळी पाठवण्यात आलेली छायाचित्रे आणि यानाची सकारात्मक प्रगती ही आजच्या या यशाची ग्वाही देत होते.
भारतीयांना असलेली यशाची खात्री आणि शास्त्रज्ञांचे कर्तृत्व आणि त्यांच्या बुद्धिमत्तेवरील अढळ विश्वास आज सार्थ ठरला आहे.
या मोहिमेत इस्त्रोसोबतच देशातील काही खासगी कंपन्यांचा देखील सहभाग होता, ज्यांचा आम्ही नुकताच ‘उद्योगरत्न’ पुरस्काराने सन्मान् केला त्या रतन टाटाजी यांच्या टाटा स्टील कंपनीमध्ये बनविण्यात आलेल्या क्रेनचा वापर रॉकेट लॉन्चसाठी करण्यात आला, याचा मला अतिशय आनंद आहे.
परवा रशियाचे ‘लुना-२५’ यान चंद्रावर उतरण्याआधीच कोसळले होते, त्या पार्श्वभूमीवर आज चंद्रयान ३ चे यश हे संपूर्ण जगात उजळून निघाले आहे.
भारत आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे, त्यामुळे आजचे यश हे देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा ठरले आहे, या मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
चंद्रयान ३ मोहीमेमधील विक्रम लॅन्डरच्या यशस्वी लॅंडिंगबद्दल समस्त भारतीयांचं आणि शास्त्रज्ञांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो…

भारत पहिला देश

भारताच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. आतापर्यंत कोणालाचा जे जमले नाही ते भारताने करून दाखवले आहे. संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारताच्या यानाने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -