नवी दिल्ली: चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यासोबतच भारताने इतिहास रचला. चांद्रयान ३ (chandrayaan 3) आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरले. देशभरात चांद्रयान ३च्या यशाचा जल्लोष सुरू आहे. संपूर्ण देश आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (indian space research organisation) गेल्या चार वर्षांपासून या अभिमानास्पद क्षणाची वाट पाहत होते.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. यामागे इस्त्रोच्या टीमची भरपूर मेहनत आणि चिकाटी आहे. त्यांनी गेली चार वर्षे इतकी प्रचंड मेहनत केली की त्यामुळेच आजचा हा सोनेरी दिवस सगळ्यांना दिसत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या आयुष्यात चांद्र मोहीम फत्ते करणे इतकेच ध्येय होते. जाणून घ्या हे चेहरे यांनी ही मोहीम यशस्वीपणे राबवली.
VIDEO | “I would like to take this opportunity to thank the people behind this mission,” says ISRO chief S Somanath as he introduces his team after Chandrayaan-3’s successful landing on the Moon. pic.twitter.com/fqlibooHnN
— Press Trust of India (@PTI_News) August 23, 2023
डॉ. एस सोमनाथ इस्रो प्रमुख
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस सोमनाथ यांच्या नेतृत्वात चांद्रयान ३ ही मोहीम यशस्वी झाली. यही मोहीम यशस्वी झाल्यानंतर ते म्हणाले, मी सर्व भारतीय आणि त्या सर्वांचे आभार मानतो ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना ेली. मी किरण कुमार सर, श्री कमलाधर, कोटेश्वर राव यांचे आभार मानतो. ते खूप मदत करत आहेत आणि संघाचा भागही आहेत. आम्हाला संघातील सर्व सहकाऱ्यांकडून विश्वास मिळाला. एअरोस्पेस इंजीनिअर डॉ एस सोमनाथ यांनी व्हीकल मार्क ३ डिझाईल केले ज्याला बाहुबली रॉकेट म्हटले जाते. बाहुबली रॉकेटने चांद्रयान ३ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवले.
एम शंकरन – यू आर राव सॅटेलाईट सेंटरचे संचालक
चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगनंतर भारताच्या सर्व उपग्रहांचे डिझाईन निर्माण करणाऱ्या टीमचे नेतृत्व करणार एम शंकरन म्हणाले, चार वर्षांपासून आम्ही याच मिशनसाठी जगत आहोत. खाताना, पिताना, झोपताना केवळ याच मोहिमेचा विचार. यासाठी इस्रोच्या टीमने जे प्रयत्न केलेत ते कल्पनाशक्तीच्या बाहेरचे आहे. भविष्यात आम्ही शुक्र, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करू.
कल्पना के – चांद्रयान ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर
चांद्रयान ३च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्त्रोच्या प्रमुखांसोबत दुसरा चेहरा दिसला तो म्हणजे या चांद्रयान ३ मोहिमेच्या डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर कल्पना के. त्या देशाच्या नारीशक्तीचे प्रतीक बनल्या आहेत. कोरोना काळातही त्यांनी चांद्र मोहिमेचे स्वप्न काही सोडले नव्हते. गेल्या चार वर्षांपासून त्या दिवस रात्र या मोहिमेवर काम करत आहेत.
पी वीरमुथुवेल – चांद्रयान ३चे प्रोजेक्ट डायरेक्टर
पी वीरमुथुवेल यांनी २०१९मध्ये चांद्रयान ३च्या परियोजन डायरेक्टच्या रूपात कार्यभार सांभाळला होता. याआधी त्यांनी इस्रोच्या मुख्य कार्यालयात स्पेस इन्स्फ्रास्ट्रक्चर प्रोग्राम कार्यालयात उप संचालकपद सांभाळले होते.
एस उन्नीकृष्णन नायर – विक्रम साराभाई अंतराळ केंद्रचे संचालक
एअरोस्पेस इंजीनियर डॉ. उन्नीकृष्णन अंतराळात भारताच्या मानव मोहीमेचे नेतृत्व करत आहे. ते रॉकेटचा विकास आणि निर्मितीशी संबंधि विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक आहेत. त्यांच्याकडे केरळच्या थुम्बास्थित विक्रम साराभाई अंतरा केंद्र, जिओसिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हेईल मार्क ३ विकसित करण्याची जबाबदारी होती.