Thursday, July 18, 2024
HomeदेशChandrayaan 3: हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे - पंतप्रधान मोदी

Chandrayaan 3: हा क्षण विकसित भारताच्या शंखनादाचा आहे – पंतप्रधान मोदी

मुंबई: चांद्रयान ३च्या (chandrayaan 3) यशस्वी लँडिंगनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेतून ऑनलाईन पद्धतीने चांद्रयान ३चे लँडिंग पाहिले. जसे लँडर विक्रमने चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवले तसे इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी जाहीर केले की आपण चंद्रावर पोहोचलो. प्रमुखांनी इतकं म्हणताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हातात झेंडा घेऊन फडकावू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसत होते.

पंतप्रधान याबाबत म्हणाले जेव्हा आपण इतिहास बनताना पाहतो तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना आपल्या आयुष्यात चिरंजीव चेतना बनून राहतात. हा क्षण विकसित भारताचा शंखनाद आहे. हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे. हा क्षण कठीण महासागर पार करण्याचा आहे. हा क्षण विजयाच्या चंद्रपथावर चालण्याचा आहे. हा क्षण अविस्मरणीय आहे.

 

धरतीवर संकल्प, चंद्रावर साकार

मोदी म्हणाले, हा क्षण भारताच्या विजयाचा आहे. आम्ही धरतीवर संकल्प केला आणि चंद्रावर तो साकार केला. आज आम्ही अंतराळात नव्या उड्डाणाचे साक्षीदार बनले आहेत. मोजी म्हणाले हा क्षण १४० कोटी लोकांसाठी उमंग देणारा आहे.

आम्ही ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत आहोत मात्र माझे मन चांद्रयान ३ जवळच बोते. मी चांद्रयान ३ आणि इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करतो. या अद्भुत क्षणासाठी १४० कोटी देशवासियांना कोटी कोटी अभिनंदन करतो.

 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश

भारत चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचला आहे जेथे जगातील अद्याप कोणत्याच देशाला जाता आलेले नाही. आता चंद्राबाबतचे सर्व गैरसमज दूर होतील. कथानके बदलतील आणि नव्या पिढीसाठी म्हणीही बदलतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -