Tuesday, September 16, 2025

Chandrayaan 3: इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज, उरलेत फक्त काही तास, देशभरात प्रार्थना

Chandrayaan 3: इतिहास रचण्यासाठी भारत सज्ज, उरलेत फक्त काही तास, देशभरात प्रार्थना

मुंबई: भारत इतिहास रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. ज्या क्षणाची संपूर्ण जग आतुरतेने वाट पाहत आहे त्या ऐतिहासिक क्षणासाठी केवळ काहीच तास उऱले आहेत. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान ३चे (chandrayaan 3) लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर उतणार आहे.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरू शकतो. गेल्या काही दिवसांत रशियानेही येथे आपले यान पाठवले होते मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे ते चंद्रावर कोसळले. यामुळेच चांद्रयान ३ कडून अधिक अपेक्षा वाढल्या आहेत. संपूर्ण देशभरात चांद्रयान ३ यशस्वी होण्यासाठी होमहवन, प्रार्थना केल्या जात आहेत.

चांद्रयान ३ ही इ्स्रोची अतिशय महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत चांद्रयान ३चे लँडर मॉड्यूल बुधवारी संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. हे लँडर मॉड्यूल लँडर(विक्रम)आणि रोव्हर(प्रज्ञान) लेस आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणीच गेलेले नाही

चार वर्षात चंद्राला दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा हा इस्रोचा दुसरा प्रयत्न आहे. जर बुधवारी यात यश मिळाले तर इस्त्रो इतिहास रचणार. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश असेल. चंद्राच्या पृष्ठभागावर अमेरिका, सोव्हिएत संघ आणि चीन यांना सॉफ्ट लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. मात्र चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अद्याप कोणीही उतरलेले नाही त्यामुळे असे करणारा भारत पहिला देश ठरेल.

याआधी चांद्रयान २ मोहिमेत इस्रोला अपयश मिळाले होते. ७ सप्टेंबर २०१९ला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यांचे लँडर विक्रम ब्रेकसंबंधी प्रणाली बिघाड झाल्याने चंद्रावर आपटले होते. भारताचे पहिले चांद्रयान १ २००८मध्ये प्रक्षेपित केले होते.

१४ जुलैला भारताने लाँच केले होते चांद्रयान ३ मिशन

भारताने १४ जुलैला एलव्हीएम ३ प्रक्षेपकाच्या सहाय्याने आपल्या तिसऱ्या चांद्रयानाचे प्रक्षेपण केले होते. या मोहिमेसाठी ६०० कोटींचा खर्च झाला. आपल्या ४१ दिवसांच्या प्रवासानंतर हे यान आज चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यासाठी सज्ज झाले आहे.

Comments
Add Comment