Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीकसा होता...? चांद्रयान-३ चा ४० दिवसांचा प्रवास...

कसा होता…? चांद्रयान-३ चा ४० दिवसांचा प्रवास…

 चांद्रयान-३ चा ४० दिवसांचा प्रवास :

  • ५ जुलै : चांद्रयान-३ ला अंतराळात नेणाऱ्या LVM-३ रॉकेटशी जोडण्यात आले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात प्रक्षेपणाची तयारी सुरू
  • ६ जुलै : इस्रो (ISRO) ने मिशन चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली.
  • ११ जुलै : चांद्रयान-३ ची ‘लाँच रिहर्सल’ करण्यात आली. इस्रोकडून चांद्रयान-३ प्रक्षेपणाची तालीम पूर्ण.
  • १४ जुलै : लाँच व्हेईकल मार्क-III (LVM-३) म्हणजेच ‘बाहुबली रॉकेट’ द्वारे चांद्रयान-३चे श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून २.३५ वाजता यशस्वी प्रक्षेपण.
  • १५ जुलै : LVM ३-M4 रॉकेटने चांद्रयान-३ योग्य कक्षेत पोहोचवले. चांद्रयान-३ ने ४१७६२ किमी x १७३ किमीची कक्षा गाठली. चांद्रयान-३ ने चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला.
  • १७ जुलै : चांद्रयान-३ हे ४१६०३ किमी x २२६ किमीच्या दुसऱ्या कक्षेत पोहोचलं.
  • २२ जुलै : चांद्रयान-३ ने चौथ्या कक्षेत प्रवेश केला. अंतराळयान ७१३५१ किमी x २३३ किमीच्या कक्षेत पोहोचले.
  • २५ जुलै : चांद्रयान-३ ला पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर काढण्यासाठी बुस्टिंग करण्यात आले. निर्धारित वेळेत चांद्रयान-३ चे इंजिन चालू करण्यात आले. त्यानंतर या यानाला पुरेसा वेग देऊन त्याला चंद्राच्या दिशेने पाठवण्यात आले.
  • १ ऑगस्ट : चांद्रयान-३ ट्रान्सलुनर कक्षेत (२८८ किमी x ३६९३२८ किमी) पोहोचलं.
  • ५ ऑगस्ट : चांद्रयान-३ ने यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत (१६४ किमी x १८०७४ किमी) प्रवेश केला.
  • ६ ऑगस्ट : अखेर चंद्राचे दर्शन झाले! चांद्रयान-३ यानाने चंद्राचा पहिला फोटो पाठवला.
  • ६ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत दाखल झाले. ६ ऑगस्ट २०२३ रोजी यान १७० x ४३१३ किमी कक्षेत पोहोचले.
  • ९ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत यशस्वीरित्या पोहोचले. चांद्रयान-३ ने ९ ऑगस्ट रोजी दुपारी १.४० वाजता कक्षा बदलली.
  • 10 ऑगस्ट : चांद्रयान-३ ने पृथ्वी आणि चंद्राचे फोटो पाठवले.
  • १४ ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागाजवळ पोहोचले. यानाने १५० किमी x १७७ किमीवर चौथ्या कक्षेत प्रवेश केला.
  • १६ ऑगस्ट : अंतराळयानाने १६३ किमी x १५३ किमीची चंद्राची पाचवी आणि अंतिम कक्षा गाठली.
  • १७ ऑगस्ट : चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळे झाले.
  • १८ ऑगस्ट : चांद्रयान -३ चंद्राच्या ११३ किमी x १५७ किमी कक्षेत पोहोचलं. विक्रम लँडरचा वेग कमी करण्याची डिबूस्टिंग प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. चांद्रयान-३ चंद्रापासून ३० किमी अंतरावर पोहोचले.
  • २० ऑगस्ट : चांद्रयान-३ चंद्राच्या १३४ किमी x २५ किमी कक्षेत पोहोचण्यासाठी डिबूस्टिंग प्रक्रियेद्रवारे विक्रम लँडरचा वेग पुन्हा कमी करण्यात आला आणि चांद्रयान-३ चंद्रापासून २५ किमी अंतरावर पोहोचले.
  • २१ ऑगस्ट : चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ चा एकमेकांशी संपर्क झाला. इस्रोची चांद्रयान-२ मोहीम अयशस्वी ठरली तरी, चांद्रयान-२ चं ऑर्बिटर अद्यापही अवकाशात चंद्राला प्रदक्षिणा घालत आहे.

२३ ऑगस्ट : चांद्रयान-३ चा वेग आता हळूहळू कमी करीत चांद्रयान- ३ हे २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान -३ उतरवणारा भारत जगात पहिला देश ठरला.

३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास
भारताची अंतराळातील महात्वाकांक्षी मोहीम चांद्रयान-३ ने १४ जुलै २०२३ पासून पृथ्वीपासून चंद्रापर्यंतच्या प्रवासाला सुरुवात झाली. चांद्रयान-३ ला पृथ्वीपासून चंद्रापर्यंत पोहचण्यासाठी ३.८४ लाख किलोमीटरचा प्रवास करावा लागला. इतका मोठा प्रवासाचा पल्ला गाठल्यानंतर चांद्रयाण -३ आज बुधवारी सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी यशस्वीरित्या चंद्रावर उतरले आणि ही महत्वाकांक्षी मोहीम पूर्ण झाली. चंद्राच्या पृष्ठभागावर या यानाला ४० दिवसांचा प्रवास करावा लागला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -