मोहोळ : ईको कारला अज्ञात वाहनाने समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात (Accident) चार जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज पहाटे साडेचार वाजता सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील यावली गावच्या नजीक घडला. या अपघाताची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
या अपघातात आदमअली मुनावरअली शेख (वय- ३७), हिराबाई रामदास पवार (वय -७५), कमलाबाई मारूती वेताळ (वय- ६०), द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय – ४०) (सर्व रा. राजनगाव मशीद, ता. पारनेर जि. अहमदनगर) या चार जणांचा मृत्यू झाला. तर बाळी बाबु पवार (वय-२७), छकुली भिमा पवार (वय – २७), साई योगीराज पवार (वय -७), मंदाबाई नाथा पवार (वय -५२), सुरेखा भारत मोरे (वय- ४५), बायजाबाई रामदास पवार (वय -६०) (सर्व रा. राजनगाव मशीद) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर सोलापूर येथील ग्रामिण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra