Monday, July 15, 2024
HomeदेशRescue : इटली सांगून लिबियामध्ये सोडले, नोकरीच्या नावाने १३ लाखांना गंडा, १७...

Rescue : इटली सांगून लिबियामध्ये सोडले, नोकरीच्या नावाने १३ लाखांना गंडा, १७ भारतीयांची सुटका

नवी दिल्ली : परदेशात तुम्हाला कोणीतरी चांगली नोकरी मिळेल असे सांगून लाखो रूपये घेईल. त्यानंतर अशा जागी सोडतील ज्याठिकाणी गृहयुद्धासारखी परिस्थिती असेल. तेथील माफिया तुम्हाला कैदेत ठेवतील आणि खाण्यापिण्याशिवाय चांगले काम करून घेतील. त्यानंतर या माफियांच्या जाळ्यातून वाचल्यानंतर गैरपद्धतीने देशात घुसल्याप्रकरणी तुरुंगात कैद केले जाईल. या गोष्टींचा नुसता विचार करूनच अंगावर काटा येतो ना? मात्र हे असे १७ भारतीयांसोबत घडले आहे. हे भारतीय अनेक महिन्यांपर्यंत अशाच स्थितीत होते. दरम्यान, यांची सुटका करण्यात आली असून ते भारतात परतले आहे.

हे भारतीय मायदेशात परतल्यानंतर ट्युनिशियामध्ये भारतीय दूतावासने ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की १७ भारतीयांपैकी अधिकाधिक पंजाब आणि हरयाणा येथील रहिवासी होते. त्यांना या वर्षी फेब्रुवारीमध्ये लीबियामध्ये कैद करून आणण्यात आणले होते. दरम्यान हे सर्व २० ऑगस्टला सुरक्षितरित्या भारतात परतले आहेत.

कसे अडकले होते जाळ्यात?

ट्रॅव्हल एजंटने त्यांच्या गरजेचा गैरफायदा उचलला. यांना चांगल्या नोकरीचे अमिष दाखवले त्यांच्याकडून पैसे घेतले आणि त्यांना लिबीयामध्ये सोडले. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खादार विक्रमजीत सिंह यांच्या माहितीनुसार या लोकांकडून १३-१३ लाख रूपये घेण्यात आले आणि त्यांना इटलीमध्ये चांगली नोकरी देतो असे अमिष देण्यात आले. त्यासाठी यांना दुबईला नेण्यात आले. त्यानंतर इजिप्तला आणण्यात आले. त्यानंतर लीबिया देशात सोडण्यात आले.

काही लोकांनी त्यांच्या टीमशी संपर्क केला आणि सगळी गोष्ट सांगितली. त्यानंतर त्यांनी या भारतीयांना राहण्यासाठी हॉटेलमध्ये व्यवस्था केली.हॉटेलच्या कोणत्यातरी व्यक्तीने पोलीस आयुक्तांना ही माहिती दिली. तेथून यांची रवानगी जेलमध्ये झाली.

एक महिन्यांपासून जेलमध्ये होते कैद

लीबियामध्ये भारतीय दूतावास बंद आहे. अशातच ट्युनिशियाच्या दूतावासाशी संपर्क करण्यात आला. २६ मेला ट्युनिशियामध्ये भारतीय दूतावासला याची माहिती दिली. सुटका झालेल्या लोकांनी सांगितले की त्यांना लीबियाच्या ज्वारा शहरामध्ये माफियांनी अपहरण केले होते. यानंतर १३ जूनला लीबियाच्या अधिकाऱ्यांनी भारतीयांची तेथून सुटका केली. मात्र त्यांना राजधानी त्रिपोलीच्या जेलमध्ये बंद केले. या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गैरकायदा पद्धतीने लीबियामध्ये दाखल होण्याचा आरोप केला होता.

या १७ भारतीयांपैकी १२ लोक पंजाब आणि हरयाणा येथील आहेत. लीबियाचे अधिकारी या भारतीयांना सोडण्यास तयार नव्हते. त्यानंतर ट्युनिशियाचे राजदूत आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दखल दिल्यानंतर लीबियाने त्यांना सोडण्याच नकार दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -