Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाAsia Cup: आशिया कपच्या संघनिवडीवर गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

Asia Cup: आशिया कपच्या संघनिवडीवर गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने आशिया कप २०२३साठी (asia cup 2023) भारताच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आशिया कप २०२३ पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंका (srilanka) या देशात खेळवला जाणार आहे. ३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ही स्पर्धा रंगणार आहे.

आशिया कप २०२३मध्ये भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला रंगणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने की भारताकडे आपल्या वनडे संघात चौथ्या स्थानासाठी फलंदाजांचे खूप पर्याय आहेत आणि केवळ एका स्थानावर लक्ष देऊन वर्ल्डकपसारख्या स्पर्धा जिंकता येत नाहीत. गांगुलीने सांगितले की समितीला एका खेळाडूला ठरवून त्याला चौथ्या स्थानासाठी संधी दिली पाहिजे.

आशिया कपबाबत गांगुलीने दिली ही प्रतिक्रिया

भारतीय क्रिकेट मंडळाचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, भारताकडे प्रचंड प्रतिभा आहे. मी अशा तक्रारी ऐकत आहे की आमच्याकडे हे नाही आमच्याकडे ते नाही. मात्र आमच्याकडे खूप काही आहे आणि समस्या ही आहे की आपल्याला निर्णय घेता येत नाहीये. फलंदाजीत चौथ्या क्रमांकासाठी राहुल द्रविड, निवड समिती आणि रोहित शर्माने कोणत्याही एका खेळाडूला निवडून सातत्याने संधी दिली पाहिजे.

नंबर चार बाबत म्हणाला असं काही

गांगुलीने पुढे सांगितले, चौथा क्रमांक हा केवळ एक नंबर आहे आणि यात कोणीही फिट होऊ शकते. मी वनडे क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळण्यास सुरूवात केली आणि नंतर डावाची सुरूवात करू लागलो आणि त्यावेळेसचा तत्कालीन कर्णधार सचिन तेंडुलकरने असे सांगितले होते. सचिनसोबतही हेच झाले. तेंडुलकरने करिअरच्या सुरूवातीला सहाव्या स्थानावर फलंदाजी केली होती. जेव्हा त्याच्या कर्णधाराने त्याला डावाची सुरूवात करण्यास सांगितले तेव्हा तो जागतिक स्तराचा खेळाडू बनला. चौथ्या स्थानावर कोणीही खेळू शकतं तेथे विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के एल राहुलसारखे खेळाडू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -