Monday, May 5, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील पोस्टात भरती, आजच अर्ज करा!

नवी मुंबई कार्यक्षेत्रातील पोस्टात भरती, आजच अर्ज करा!

४२ पदांसाठी २३ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय डाक विभागाने नवी मुंबई कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी २३ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छुक उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करावेत, व्यक्तिश: सादर केलेल अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी दिली आहे.

नवी मुंबईतील अधीक्षक डाकघर यांच्या कार्यक्षेत्रातील ४२ रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पोस्ट विभाग उमेदवारांना कोणताही दूरध्वनी करत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी, पत्रव्यवहार जर असेल तर केला जातो. उमेदवारांनी वैयक्तिक माहिती/ नोंदणी क्रमांक/ मोबाईल क्रमांक / ई-मेल आयडी इतरांना देऊ नये. कोणत्याही अनैतिक फोन कॉल्सपासून सावध राहण्याचा सल्ला पत्रकाद्वारे वरिष्ठ अधीक्षकांनी दिला आहे.

Comments
Add Comment