Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाAsia cup: केवळ २ सामन्यांनी बदलले या खेळाडूचे नशीब, मिळाली आशिया कपमध्ये...

Asia cup: केवळ २ सामन्यांनी बदलले या खेळाडूचे नशीब, मिळाली आशिया कपमध्ये संधी

नवी दिल्ली: पाकिस्तान (pakistan) आणि श्रीलंकामध्ये (srilanka) आशिया कप (asia cup) यावेळएस ३० ऑगस्टपासून खेळवला जात आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

टीम इंडियात अनेक स्टार खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. तर या १७ सदस्यीय संघात एक असाही खेळाडू आहे ज्याने भारतासाठी एका वर्षापासून एकही सामना खेळला नव्हता. मात्र आयर्लंडविरुद्धच्या खेळवल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातील कामगिरीच्या जोरावर आशिया कपसाठी संघात स्थान मिळवले आहे.

केवळ २ सामन्यांनी उघडले या क्रिकेटरचे नशीब

दुखापतीमुळे साधारण वर्षभर भारतीय संघापासून दूर असलेला वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आयर्लंड दौऱ्यावर आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला आशिया कपसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. प्रसिद्ध कृष्णाने ऑगस्ट २०२२मध्ये हरारेमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियासाठी आपला सामना खेळला होता. तेव्हापासून तो स्ट्रेस फ्रॅक्चरच्या कारणाने बाहेर होता.

प्रसिद्ध कृष्णाने निवड समितीचे वेधले लक्ष

प्रसिद्ध कृष्णाने आयर्लंड दौऱ्यात खेळवल्या जात असलेल्या टी-२० मालिकेतील सुरूवातीच्या दोन सामन्यांत ४ विकेट मिळवले आहेत. याशिवाय २७ वर्षीय प्रसिद्ध कृष्णाने २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले होते.

प्रसिद्ध कृष्णाने टीम इंडियासाठी आतापर्यंत १४ वनडे सामने खेळलेत. यात प्रसिद्धने ५.३ इकॉनॉमीने धावा दिल्यात आणि २५ विकेट मिळवलेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्याने ११ सामन्यात एकूण ४९ विकेट मिळवले आहेत.

आशिया कप २०२३साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कप्तान), शुभमन गिल, हार्दिक पांड्या (उपकप्तान), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव , ईशान किशन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा, संजू सैमसन (राखीव).

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -