केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची महत्वपूर्ण घोषणा
नवी दिल्ली : केंद्र सरकार नाफेडमार्फत (NAFED) दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी केली आहे. त्यामुळे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
कांदा प्रश्नावर (Onion Issue) राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Mudne) आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यात आज दिल्ली येथे झालेल्या बैठकीत कांदा प्रश्नावर महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क वाढविल्यामुळे (Export Duty) गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत होते. त्यामुळे आंदोलने करण्यात आली. रास्ता रोको करण्यात आला. या पार्श्वभूमीवर आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेत कांदा प्रश्नावर चर्चा केली. यावर पियुष गोयल यांनी सकारात्मक उत्तर देत कांदा प्रश्नावर दिलासा देणारी घोषणा केली आहे. त्यानुसार केंद्र सरकार नाफेडमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा २ हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल भावाने खरेदी करणार असल्याची घोषणा मंत्री पियुष गोयल यांनि केली आहे.