Saturday, July 13, 2024
HomeदेशChandrayaan 3: चंद्रापासून २५ किमी दूर आहे 'चांद्रयान ३', विक्रम लँडरने बनवला...

Chandrayaan 3: चंद्रापासून २५ किमी दूर आहे ‘चांद्रयान ३’, विक्रम लँडरने बनवला शानदार Video

नवी दिल्ली : चांद्रयान ३चे (chadrayaan 3) विक्रम लँडर (vikram lander) सध्याच्या घडीला चंद्राच्या चारही बाजूंना २४ किमी x १३४ किमीच्या कक्षेत फिरत आहे. लँडरचा मुख्य कॅमेरा म्हणजेच लँडर इमेजरने शानदार व्हिडिओ बनवला आहे.

हा व्हिडीओ २० ऑगस्ट २०२३ला दुसऱ्यांदा डिबूस्टिंग केल्यानंतर बनवण्यात आला आहे. यात एका बाजूला फिरताना चंद्र दिसत आहे. दुसरीकडे विक्रम लँडरच्या सोलार पॅनल्स आणि गोल्डन रेडिएशन कव्हर आहे. हा व्हिडिओ सांगतो की चांद्रयान ३ उत्तम स्थितीत आहे.

 

आधी या कॅमेऱ्याने १७ ऑगस्ट २०२३च्या दुपारी जेव्हा विक्रम लँडर चांद्रयान ३च्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाले होते तेव्हा चंद्राचा फोटो घेतला होता. व्हिडिओ बनवला.

या फोटोत विक्रम लँडरने ज्या ठिकाणचा फोटो घेतला आहे त्यात दोन तीन क्रेटर्स म्हणजेच खड्ड्यांना नावही देण्यात आले आहे. इस्रोने सांगितले होते की हे खड्डे कोणते आहेत. इस्रोने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ जारी केला आहे. याआधी थोड्या वेळाआधी इस्रोने लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने चंद्राचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता.

कधी होणार लँडिग

चांद्रयान ३च्या लँडिंगची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. सगळेचजण यासाठी उत्सुक आहे. उद्या म्हणजेच २३ ऑगस्टला संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -