
नवी दिल्ली: आशिया कप २०२३ आधी एका संघाला मोठा झटका लागला आहे. संघाचा एक स्टार खेळाडू या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. आशिया कप पाकिस्तानच्या यजमानपदाखाली हायब्रिड मॉडेलच्या मदतीने खेळवले जाईल. या स्पर्धेची सुरूवात ३० ऑगस्टपासून होणार आहे आणि १७ सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.
आशिया कपसाठी आतापर्यंत ४ देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र यातील एका देशाला आपल्या टीममध्ये मोठा बदल करावा लागला आहे. या संघाचा मॅचविनर खेळाडू दुखापतीमुळे आशिया कप २०२३मधून बाहेर गेला आहे.
आशिया कप २०२३मधून बाहेर गेला हा खेळाडू
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज इबादत हुसैन गेल्या महिन्यात अफगाणिस्तानचा वनडे मालिकेत गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर गेला आहे. इबादत हुसैनला १० दिवस आधी १७ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले होते.मात्र तो दुखापतीतून बरा झालेला नाही. त्याच्या जागी २० वर्षीय वेगवान गोलंदाज तंजीम हसनला संघात सामील करण्यात आले आहे. दरम्यान, इबादत वर्ल्डकपसाठी फिट असेल की नाही हे ही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आशिया कप २०२३साठी बांगलादेशचा संघ
शाकिब अल हसन (कर्णधार), लिट्टन दास, तनजीद हसन तमीम, नजमुल हुसैन शान्तो, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन मम्हूद, महेदी हसन, नसुम अहमद, शमीम हुसैन, अफीफ हुसैन, शोरफुल इस्लाम, तंजीम हसन, मोहम्मद नईम.