Thursday, September 18, 2025

Crime news : चारित्र्यावर संशय घेत १७ वर्षीय मुलाने केली आईची हत्या

Crime news : चारित्र्यावर संशय घेत १७ वर्षीय मुलाने केली आईची हत्या

वसई : वसईच्या माजिवली देपिवली ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत सदस्य सुनिता सुनिल घोघरा (वय ३६) या महिलेची तिच्याच १७ वर्षाच्या मुलाने राहत्या घरात गळा चिरुन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ही घटना वसई तालुक्यातील देपीवली गावात रविवारी (२० ऑगस्ट) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली होती. ही महिला मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत माजिवली देपिवली ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत सदस्यपदी निवडूनही आली होती.

सुनिता ही वालीव परिसरात नोकरीला जात असे. रविवार सुट्टी असल्याने या दिवशी ती घरात होती. रात्रीचे जेवण करुन सुनिता आपल्या खोलीत झोपी गेली असता तिच्या अल्पवयीन मुलाने तिच्यावर कुऱ्हाडीने तीन वार करुन घराबाहेर गेला. काही वेळाने मृत महिलेचा पती घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला जखमी अवस्थेत बघून तिला उपचारासाठी भिवंडी येथे रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मात्र संबंधित घटनेची नोंद मांडवी पोलिसात करण्यात आली.

पोलिसांनी सुरुवातीला तिच्या पतीला ताब्यात घेतले. मात्र त्यानंतर मुलाची चौकशी केली असता आपणच आईच्या चारित्र्यावर संशय घेत कुऱ्हाडीने वार करत हत्या केल्याचे मुलाने कबूल केले आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment