
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway) खोपोलीजवळ पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या लेनवर आज सकाळी नऊच्या सुमाराला कंटेनर उलटल्याने झालेल्या अपघातात चार ते पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात दाखल केले आहे.

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी वाहतूक सुरळीत आहे. मात्र पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.
दरम्यान, सतत अपघात होत असल्याने प्रवाशी नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
