Asia cup India team : आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा! कोणाचे कमबॅक आणि कोणाचा झाला पत्ता कट?

'या' दिग्गज खेळाडूंना मिळाली संधी


नवी दिल्ली : विश्वचषकासाठी रंगीत तालमीप्रमाणे असणार्‍या आशिया चषकासाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची (India team) निवड करण्यात आलेली आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर (Ajit Agarkar), मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात नवी दिल्ली येथे जवळपास दोन-अडीच तास बैठक झाल्यानंतर अखेर निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि इशान किशन आघाडीचे फलंदाज असतील तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर असेल. हार्दिक पांड्या उपकर्णधार असणार आहे.


३० ऑगस्ट २०२३ ते १७ सप्टेंबर २०२३ या दरम्यान आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. विशेष बाब म्हणजे दुखापतीतून सावरत असणाऱ्या केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांचे या निमित्ताने भारतीय संघात कमबॅक झाले आहे तर युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांचा मात्र पत्ता कट झाला आहे. दुसरीकडे तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.


इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.



आशिया कपसाठी भारतीय संघ -


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर. , सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा , संजू सॅमसन (राखीव).



जाणून घ्या आशिया चषकाचे वेळापत्रक -:



  • ३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान

  • ३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी

  • २ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी

  • ३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर

  • ४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी

  • ५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर

  • ६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर

  • ९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी

  • १० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी

  • १२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला

  • १४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला

  • १५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला

  • १७ सप्टेंबर - फायनल


Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Comments
Add Comment

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी