Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीSalman Khan: व्हायरल झाला सलमान खानचा 'गजनी' लूक

Salman Khan: व्हायरल झाला सलमान खानचा ‘गजनी’ लूक

मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भाईजान म्हणून ओळखला जाणारा सलमान खान (salman khan) देशातील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आठवडाभरआधीच १४ ऑगस्टला त्याने बिग बॉस ओटीटी २चे शूटिंग संपवले आहे. त्यानंतर आता तो आपल्या सिनेमांकडे परतला आहे. त्याने आपल्या उरलेल्या सिनेमांचे शूटिंग सुरू केले आहे.

काही कार्यक्रमादरम्यानही सलमान दिसला होता. नुकतेच त्याला एका डिनर पार्टीत स्पॉट केले गेले. या दरम्यान त्याचा वेगळाच लूक पाहायला मिळाला. त्याचे फॅन तर त्याचा हा लूक पाहून हैराणच झालेत.

सलमान नेहमी आपल्या वेगवेगळ्या स्टाईलबाजीसाठी ओळखला जातो. तो ज्या सिनेमात काम करतो त्याच लूकमध्ये असतो. प्रत्येकजण त्याची स्टाईल कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. त्याची ‘तेरे नाम’ या सिनेमातील हेअरस्टाईलही आजही चर्चेत आहे. आताही सलमान खानच्या केसांचा लूक असाच काहीसा वेगळा आहे. त्याचा या लूकचा व्हिडिओ सोशलम मीडियावर व्हायरल होत आहे.

सलमानचा नवा लूक

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता जेव्हा सलमान कारमधून उतरतो तेव्हा तेव्हा काळा शर्ट, काळी पँट आणि काळे शूज घातले आहेत. अनेकदा तो असा कॅज्युएल लूकमध्ये दिसतो. याशिवाय त्याने ब्रेसलेटही घातले होते. मात्र त्याने केस कापले होते. त्याचा लूक पाहून नक्कीच अनेकांना गजनीची आठवण आली आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, त्याचा हा लूक पाहून अनेकजण टायगर ३ साठी त्याने असा लूक केला असावा असा अंदाज बांधत आहेत. मात्र याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

याआधी २००३मध्ये आलेला सिनेमा तेरे नाम मध्ये सलमान खानने केस पूर्ण कापले होते. तो टकला झाला होता. सलमान खानच्या या बाल्ड लूकच्या चर्चा त्यावेळेसही रंगल्या होत्या. या सिनेमात सलमानसोबत भूमिका चावला होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -