Monday, July 15, 2024
HomeदेशPM Modi: पंतप्रधान मोदी २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, ब्रिक्स परिषदेत होणार...

PM Modi: पंतप्रधान मोदी २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर, ब्रिक्स परिषदेत होणार सहभागी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) उद्या म्हणजेच २२ ऑगस्टला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (south africa tour) जात आहेत. येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी १५व्या ब्रिक्स शिखर परिषदेत (brics summit) सहभागी होणार आहेत. ही शिखर परिषद २२ ते २४ ऑगस्ट या दरम्यान असणार आहे. येथे पंतप्रधान मोदी ब्रिक्स नेत्यांसोबत भेटीगाठी घेतील तसेच आर्थिक मदत, खाद्य सुरक्षा आणि संघटनेचा विस्तार या अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी २०१८मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. यासोबतच ते द. आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा याची भेट घेतील. २०१९ नंतर हे पहिल्यांदा घडणार जेव्हा सर्व नेते व्यक्तिगतपणे भेटी घेतील.

बाली जी २० नंतर पहिल्यांदा शी जिनपिंग आमनेसामने असतील

पंतप्रधान मोदी आर्थिक सहयोग, खाद्य सुरक्षा आणि ब्रिक्सच्या विस्तार या संबंधित मुद्द्यावरील चर्चेत भाग घेतील. पंतप्रधान मोदी शिखर परिषदेत सदस्य देशांना एक दुसऱ्यांच्या सुरक्षा हितांचा सन्मान करणे आणि दहशतवादाविरोधात एकजूट होण्यासाठी अपील करू शकतात.

२०१९ नंतर हे पहिल्यांदा घडणार आहे की जेव्हा ब्रिक्स शिखर परिषदेत ५०हून अधिक देशांचे नेता सामील होतील. यात दक्षिण आफ्रिकाचे राष्ट्रपती सिरिल रामफोसा, चीनचे शी जिनपिंग, ब्राझीलचे लुईज लूला दा सिल्वा आणि मोदी यांचा समावेश होण्याची आशा आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या परिषदेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होतील.

पंतप्रधान मोदी बिझनेस फोरमला संबंधित करतील. जेव्हा ब्रिक्सचे महत्त्व सांगितले जाईल.बाली जी २० परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आमनेसामने असतील.

ब्रिक्सची व्हॅल्यू

ब्रिक्सकडे जगातील ४१.५ टक्के लोकसंख्या आहे. तर या ग्रुपकडे जगातील ३२ टक्क्याहून अधिक इकॉनॉमीचा शेअर आहे. या शिवाय ग्रुपजवळ ३.२१ बिलियन लोकसंख्या आहे.

ग्रीसलाही जाणार पंतप्रधान मोदी

पंतप्रधान तेथून २५ ऑगस्टला यूनान(greece)पोहोचतील. क्वात्रा यांनी सांगितले की १९८३ नंतर भारताच्या कोणत्याही पंतप्रधानांची ही यूनानचा पहिला दौरा आहे. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अथेन्सचा राजकीय दौरा केला होता. पंतप्रधान मोदी यांचा हा अधिकृत दौरा यूनानचे पंतप्रधान यांनी निमंत्रण पाठवल्यानंतर होत आहे.

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -